Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

माळशिरस । अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून, भाऊच निघाला आरोपी

Malshiras. Murder of female village panchayat member due to immoral relationship, accused brother is in custody

Surajya Digital by Surajya Digital
September 20, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
माळशिरस । अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून, भाऊच निघाला आरोपी
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ आरोपीला ५ दिवसाची कोठडी

 

माळीनगर : माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे अनैतिक संबंधातून महिला ग्रामपंचायत सदस्याचा खून झालाय. यात आरोपीस अटक केली असून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. यात आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून भाऊच निघाला आहे. Malshiras. Murder of female village panchayat member due to immoral relationship, accused brother is in custody

 

अनैतिक संबंधातून वाफेगाव (ता. माळशिरस) येथील ग्राम पंचायत सदस्य नंदा मोहन बनसोडे (वय ३४ रा.बनसोडे वस्ती, वाफेगाव) यांचा साडीने गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना वाफेगाव (ता.माळशिरस) येथील शेतात काल सोमवारी (ता. 19) दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात मयत नंदा बनसोडे यांचा चुलत भाऊ शंकर दिगंबर सरवदे (वय २८ रा.वाफेगाव) याला अकलूजच्या पोलिसांनी अटक केली. त्याला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज मंगळवारी दिला.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी, काल सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाफेगाव येथील शेतात नंदा बनसोडे या महिलेचा मृतदेह साडीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेचे फिर्याद मयताचे पती मोहन शंकर बनसोडे (वय ४२ रा.वाफेगाव) यांनी अकलूज पोलिसात दाखल केली. अनैतिक संबंधाच्या कारणावरून शंकर सरवदे याने आपली पत्नी नंदा यांचा साडीने गळा आवळून खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेतली.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहेत.

□ वडिलाचाही असाच खून

 

आरोपीच्या वडिलाचा देखिल अशाच पद्धतीने खून झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी शंकर दिगंबर सरवदे (रा.वाफेगाव) याच्या वडिलांचाही खून गळा आवळून झाला होता. मात्र त्या प्रकरणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. या प्रकरणाचे गौडबंगाल काय आहे. या प्रकरणातील आरोपी कोण आहेत याचीही वेगळीच चर्चा सध्या गावात सुरू असल्याचे वृत्त आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ २५ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोघेजण अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर :  वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याने मंडल अधिकार्‍यासह कोतवालास दोन वेळा पडताळणी करून अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.

मदनसिंग सुपडसिंग परदेशी (वय-३५,पद-मंडल अधिकारी,अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षीण सोलापूर,२) मल्लिनाथ रेवणसिध्द बाळगी (वय-३६,पद-कोतवाल,अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता.दक्षीण सोलापूर) या दोघांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांचे बाजुने निकाल देणेसाठी यातील आलोसे कोतवाल मल्लिनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांचे करिता म्हणून तक्रारदार यांचेकडे २५  हजार रुपये लाचेची मागणी केली.  त्याबाबत खात्री करुन देणे करिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

 

ही कारवाई उमाकांत महाडीक,पोलीस निरीक्षक,लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोशि स्वप्नील सण्णके, चापोशि उडानशिव सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

 

Tags: #Malshiras #Murder #female #village #panchayat #member #immoral #relationship #accused #brother #custody#माळशिरस #अनैतिक #संबंध #महिला #ग्रामपंचायत #सदस्य #खून #भाऊच #आरोपी #कोठडी #वाफेगाव
Previous Post

शरद पवारांचे ऐकल्यामुळेच आज शिवसेनेची ही अवस्था – शंभूराज देसाई

Next Post

Dragon Fruit ‘ड्रॅगन फ्रूट’ लागवड करण्यासाठी शासनाचा पुढाकार; हेक्टरी 1 लाख 60 हजारांचे अनुदान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Dragon Fruit ‘ड्रॅगन फ्रूट’ लागवड करण्यासाठी शासनाचा पुढाकार; हेक्टरी 1 लाख 60 हजारांचे अनुदान

Dragon Fruit 'ड्रॅगन फ्रूट' लागवड करण्यासाठी शासनाचा पुढाकार; हेक्टरी 1 लाख 60 हजारांचे अनुदान

वार्ता संग्रह

September 2022
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697