□ जोडे मारून नोंदवला निषेध
□ सोलापुरात तीन तालुक्यात आंदोलने
सोलापूर – ठाकरे परिवारातील सदस्यांवरील वक्तव्याचा शिवसेनेकडून आज सोलापुरात खरपूस समाचार घेण्यात आला. रामदास कदम, गुलाबराव पाटील, शहाजीबापू पाटील यांच्या पोस्टरची गाढवावरून धिंड काढून जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. Solapur. Ramdas Kadam, Gulabrao Patil, Shahajibapu poster protest against hanging a poster of Shahjibapu on a donke
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मीताई ठाकरे तसेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले रामदास कदम ,गुलाबराव पाटील आणि शहाजीबापू पाटील यांच्याकडून सातत्याने चुकीची आणि बदनामीकारक वक्तव्य करण्यात येत आहेत. आता तर ठाकरे घराण्याच्या स्नुषा रश्मीताई ठाकरे यांच्यावरच खालच्या भाषेत टीका करायला सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी तसेच मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
या तिघांचे पोस्टर गाढवाच्या गळ्यात घालून धिंड काढण्यात आली. तसेच त्यांच्या पोस्टरला जोडेही मारण्यात आले. रामदास कदमचं करायचं काय ,खाली मुंडी वर पाय ,नीम का पत्ता कडवा है, रामदास कदम भडवा है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, राजकारणात वाद – प्रतिवाद, आरोप – प्रत्यारोप होत राहतात. प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध प्रकारचे युक्तिवादही करतो. परंतु संसदीय राजकारणाची पातळी खालावली आहे. काही लोकांनी तर जणू यासाठीची सुपारीच घेतली आहे. आरोप – प्रत्यारोप करताना किंवा वादविवाद करताना ते मुद्द्यांवर असावेत, ध्येय धोरणावर असावेत तसेच आजपर्यंत होत होते. परंतु कौटुंबिक पातळीवर घसरणे गलिच्छ पातळीवर येऊन बोलणे हा काही लोकांचा धंदा झाला असल्याचे म्हटले.
ज्या रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली. विधान परिषदेतून पर्यावरण मंत्रीपद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी त्यांची काळजी घेतली. त्या रामदास कदम यांनी मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं, आणि तशी हिम्मत दाखवणं ही विकृती असून सत्तेचा माज आहे. रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच, परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही. अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख वानकर यांनी दिला.
आंदोलनाच्या व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाप्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटिका सीमाताई पाटील, उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे, तुकाराम भोजने, दादासाहेब पवार, तालुकाप्रमुख अशोक भोसले, तुकाराम कुदळे, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, य शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख , उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व शिवसेना अंगीकृत संलग्न संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.