□ सोलापुरात ८०० कोटींचे हवेतील उड्डाणपूल!
□ मतांच्या राजकारणाचा उड्डाणपूल उभारणीला लागला ब्रेक
• सोलापूर / शिवाजी भोसले
सोलापुरात तब्बल ८०० कोटींचे उड्डाणपुल हवेत आहेत बरं. हे वाचून दचकलात ना ? आपणास आश्चर्य वाटलं असेल ना ? तब्बल ८०० कोटींचे उड्डाणपूल अन् तेही हवेत… नाही विश्वास बसत ? अहो, दैनिक ‘सुराज्य’ ची ही खुरीखुरी स्टोरी तरी वाचा. 800 crore flyovers in Solapur, who wants to stop the construction of the flyover due to the politics of votes
सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलणारे साधारण ८०० कोटींचे दोन उड्डाणपूल इथ फक्त कागदावर साकारले गेलेत. उड्डाणपुलांच्या मंजुरीनंतर तब्बल ६ वर्षात उड्डाणपुलाची इथं साधी मार्किंगही झाले नाही. उड्डाणपूल कामाच्या प्रारंभाच्या कोनशिलांना अक्षरश: चिरा पडल्या. कोनशिला धूळखात पडल्या. सत्ताधारी आणि विरोधकांना उड्डाणपूल उभारणीसंदर्भात कसलीच चहाड नाही हेच इथलं पुलाबाबतचं खरंखुरं वास्तव आहे.
उड्डाणपूल उभारणीचं श्रेय भाजपवाल्यांना जाईल, म्हणून शहराच्यादृष्टीनं माईलस्टोन ठरणाऱ्या उड्डाणपूल प्रकल्पाच्या उभारणीला काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांचा आतून ‘कोलदांडा, असावा, त्यांनीच आतून वेगळं राजकारण शिजवलं, अशी चर्चा आहे.
उड्डाणपुलांच्या भूसंपादनातून नागरिकांची नाराजी नको, सत्ता केंद्राला नाराजीचा फटका नको म्हणून खुद्द भाजपालाही उड्डाणपुलांची एवढ्यात उभारणी नको असल्याचं कळतं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यातूनच उड्डाणपूल प्रकल्प मंजूर करून आणणाऱ्या भाजपवाल्यांचाही उड्डाणपूल उभारणीत रेटा दिसत नाही. शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकण्याबरोबरच अनेक आघाड्यांवर फायद्याचे ठरणाऱ्या उड्डाणपुलांच्या भूसंपादनाची नुसतीच टिमकी वाजवली जात आहे. भूसंपादन अजूनही फायलींमध्येच अडकलं आहे. उड्डाणपूल उभारणीत महापालिकेचा भूमिका आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास यापेक्षा वेगळी अजिबात नाही.
□ उड्डाणपूल उभारणीचे लेटेस्ट स्टेटस
> अब शांती शांती > भूसंपादनासाठी निधी मिळूनही जागांचे मूल्यांकन ठरता ठरेना > उड्डाणपूल उभारणीची दशा आणि दिशा जैसे थे > वाहतुकीची कोंडी, अन् अपघातांची मालिका कायमच > वेगाने भूसंपादन होण्यासाठी फाईलींना फुटेनात पाय….
□ शहराच्या चौफेर विकासाला खीळ
> वाहतुकीच्या कोंडीचा नागरिकांना करावा लागतोय दररोज सामना, शहरवासीयांना मानसिक जास खड़ेमय रस्त्याने हाडे खिळखिळी, पाठीच्या मणक्यांची वाट वाहने देखील होताहेत खिळखिळी उड्डाणपुलांच्या राजकारणाचे सोलापूरकरांच्या नशिबी आलेले भोग संपणार तर कधी ?
□ बोले, तो यह सच है
• विकासाआडून दुष्ट राजकारणात सोलापूरकरांचा मधल्यामध्येच सँडविच होतोय. उड्डाणपूल अन् समांतर जलवाहिनी दोन्ही प्रकल्पांबाबत नागरिकांची नाराजी व संताप उड्डाणपूल साकारण्यावरचे प्रश्नचिन्ह नेमके केव्हा निघणार याचे उत्तर कोणाकडे नाही उड्डाणपूल उभारणीत सरकारी अधिकाऱ्यांचे हात अडकल्याचे वास्तव महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे कोण्याच राजकारण्यांना वाटतं नाही कायच मायबाप सरकार आलं द्यायला, पदर नाही घ्यायला…सोयरसूतक सोलापुरात ८०० कोटींच्या उड्डाणपुलांचे कवित्व