सोलापूर : बहुचर्चित सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी ‘उर्जावान’ नेते सुधीर खरटमल यांची निवड निश्चित करण्यात आली असून या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. Sudhir Kharatmal as City President of NCP; Solapur, the energetic face for Mission Corporation
विशेषत्वे, महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘मिशन कार्पोरेशन’ मोहीम राबवली जाणार आहे. या महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकायलाच हवा, असा मनसुबा या पक्षाचे गॉडफादर शरद पवार तसेच पक्षातील वजनदार नेते अजित पवार यांचा आहे.
या पार्श्वभूमीवर, पॉवरबाज नेता म्हणून खरटमलांची या पदी नियुक्ती करण्याचे खुद्द शरद पवार आणि अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निश्चित केल्याची माहिती आहे. मागील ४० वर्षे काँग्रेसमध्ये राहून संघटनात्मक बांधणीचे मुख्य धडाकेबाज काम करण्याबरोबरच, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद तसेच सोलापूर महापालिका या सर्व निवडणुकांसाठी खरटमल यांनी आजवर भरीव काम केले आहे, या आघाड्यांवरचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या लोकसभेच्या दोन निवडणुका वगळता उर्वरित सर्व निवडणुकांमध्ये खरटमल यांचा ‘वजनदार’ नेते म्हणून सहभाग राहिलेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवाय या पक्षातील ‘कुबेर’ म्हणून त्यांची ख्याती आहे. प्रत्येक घटकाला मदत करण्यात असलेल्या खरटमल मशहूर असलेल्या यांना मानणारी सोलापूर शहरात प्रत्येक भागात कार्यकर्त्यांची फळी आहे. हे सर्व लक्षात घेता, मुख्य सोलापूर महापालिकेसह अन्य निवडणुकांमध्ये नेतृत्व करण्याबरोबरच, या शहरात राष्ट्रवादीची जोरकस मोर्चेबांधणी करण्यासाठी तसेच राष्ट्रवादीमधील सर्वांना एका सुत्रात बांधून इप्सित साध्य करण्यासाठी सर्वसमावेश चेहरा म्हणून खरटमल यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीचे परवा दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन झाले, या अधिवेशनाला सोलापूर शहराचे अध्यक्ष म्हणून उपस्थित रहावे, असा निरोप त्यांना प्रदेश राष्ट्रवादीकडून आला होता. त्यानुसार, ते उपस्थितही राहिले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात जंगी कार्यक्रम घेऊन खरटमल यांना हे पद बहाल करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
मात्र राज्यात सत्तांतर झाले. त्यात खरटमल यांचा कार्यक्रम स्थगित राहिला अशीदेखील माहिती मिळाली. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्याचे मानून शहरात काम चालू ठेवावे, असे देखील खरटमल यांना सूचित करण्यात आल्याची माहिती मिळाली.
□ खरटमल म्हणाले, मी राष्ट्रवादीचाच शिलेदार
राष्ट्रवादीचा मी शिलेदार आहे, या पक्षात मी आता पूर्णपणे रमलो आहे, मी आता या पक्षातच राहून इतंदेखील भारतीय काँग्रेसप्रमाणं तनमनधनानं काम करणार आहे, कार्यकर्त्यांनी याची दखल घ्यावी, असं आवाहन पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटल यांनी ‘सुराज्य डिजिटल’ ला सांगितलं.