□ पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार
मुंबई : शिंदे-ठाकरे यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा वाद व शिवसेना कोणाची? यासाठी निवडणूक आयोग कार्यवाही करु शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वागत केले आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. आमच्याकडे बहुमत असून ते आम्ही सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती द्यावी, अशी ठाकरे गटाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. Supreme Court rejects Thackeray group’s plea; The Chief Minister welcomed the decision
सुप्रीम कोर्टात आज ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती द्यावी, अशी ठाकरे गटाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला आमची स्थगिती नाही, ते आपली प्रक्रिया पार पाडू शकतात, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ठाकरे गटाकडून फक्त सभागृहातील फुटीवर विचार केला जातोय, पण पक्षातही फुट पडली आहे, त्यामुळे पक्ष फुटीवर निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना नाही असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केला. तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळं आहे असा युक्तीवाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकिलाने म्हटले आहे.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस मानला गेला. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत सुनावणी होणार होती. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा मुद्द्यांवरही सुनावणी झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नलनंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं कागदपत्रं जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागण्यात येणार का हे पाहावं लागेल. शिवसेना कुणाची याचा निर्णय येत्या महिना किंवा दीड महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाकडून अॅड. अरविंद दातार यांनी बाजू मांडली. अरविंद दातार म्हणाले, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाचे काम हे विधानसभा अध्यक्षांच्या कामापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींचा निवडणूक आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत नाही. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षप्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. तुषार मेहता म्हणाले, कोणती शिवसेना खरी याचे उत्तर आयोगाला द्यायचे आहे. आयोगाला त्यांचे काम करु दिले पाहीजे. पक्ष व चिन्हाबाबत निर्णय घेण्याची परवानगी निवडणूक आयोगाला द्यावी.