पंढरपूर : वाराणसी कॉरीडॉरप्रमाणे पंढरीत देखील चौफाळा ते महाव्दार घाट या रस्त्याचे दोनशे फूट रुंदीकरण करण्याचे नियोजन अधिकारी पातळीवर सुरू असल्याचा आरोप येथील व्यापारी व नागरिकांनी केला. याला विरोध दर्शविण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात आज बंद पाळून निषेध नोंदवला. Opposition to Pandharpur Development Plan; A bandh was observed in the vicinity of Sri Vitthal temple
यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये नागरिकांची घरे किंवा दुकाने पाडून विकास करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. आषाढी एकादशीस श्री विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेस आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीर्थक्षेत्र पंढरीचा सर्वकष विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
याचाच एकभाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या पथकाने वाराणसी कॉरीडॉरीची पाहणी केली आहे. तसेच पंढरपूर येथे देखील याच पध्दतीने श्री विठ्ठल मंदिर परिसरात दोनशे फूट रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला असल्याची सध्या येथे जोरदार चर्चा सुुुुरू आहे. याला विरोध करण्यासाठी चौफाळा ते महाद्वार रस्त्यावरील दुकानदार व नागरिकांनी बंंद पाळून प्रस्तावित आराखड्यास विरोध दर्शविला.
येथील नागरिकांंनी स्थानिकांची घरे किंवा दुकाने न पाडता विकास करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी १९८२ साली मंदिर परिसरात रस्ता रूंदीकरण झाले असून त्यावेळी विस्थापित झालेल्या अनेक नागरिकांचे पुर्नवसन झाले नसल्याचे उदाहरण देण्यात आले. तसेच पंढरपूर येथे आजपर्यंत तीनवेळा रूंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे रूंदीकरणास विरोध दर्शविण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान आज बुधवारी सकाळपासूनच मंदिर परिसरातील एकही दुकाने उघडण्यात आले नाही. सकाळी अकरा वाजता व्यापारी, नागरिकांनी पश्चिमव्दार येथे ठिय्या आंदोलन करून भजन केले. मंदिर परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने भाविकांना कुंकू, बुक्का व प्रसादाचे साहित्य खरेदी करता आले नाही.
या आंदोलनात वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, भागवत बडवे, व्यापारी संघाचे प्रभाकर कौलवार, कौस्तुभ गुंडेवार, अरूण कोळी, मनसेचे संतोष कवडे, शिंदे गट शिवसेनेचे सुमित शिंदे, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक सोमनाथ होरणे, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, बाळकृष्ण डिंगरे, संजय झव्हेरी, राहुल परचंडे, राजेश उराडे, सागर खंडागळे, रोहित पारसवार आदी सहभागी झाले होते.
□ या आहेत मागण्या
यावेळी सर्वांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मंदिर समितीचा ज्ञानेश्वर दर्शन न पाडता तेथे समितीचे प्रशासकीय कार्यालय व व्हीआयपी प्रतिक्षालय करावे, मंदिर परिसरात चारचाकी प्रमाणे दुचाकी वाहनांना देखील बंदी करावी, हा परिसर अतिक्रमणमुक्त करावा व नो हॉकर्स जाहीर करून याची अंमलबजावण करावी, स्थानिकांच्या वाहनासाठी वाहनतळ करावे आदी मागण्या करण्यात आल्या.