□ आमदार गोपीचंद पडळकर करणार मार्गदर्शन
□ धनगर आरक्षणासह समाजाच्या विविध विषयांवर होणार चर्चा
□ सर्व पक्षीय समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर : सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे येत्या रविवारी (ता. २) धनगर समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी राज्यभरातील लाखो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो समाज बांधव जाणार असल्याची माहिती माऊली हळवणकर यांनी दिली आहे. Dussehra gathering of Dhangar community on Sunday in Sangli, planning meeting in Solapur
या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे नियोजनाची बैठक घेण्यात आली. यावेळी माऊली हळणवर, अमोल कारंडे, रामचंद्र वाकसे, सोमेश्वर क्षिरसागर, नागेश वाघमोडे, बिरूदेव शिंगाडे, शरणु हांडे, धनराज जानकर, समर्थ माशाळकर, अभिषेक भाईकट्टी, संस्कार नरोटे उपस्थित होते.
या मेळाव्यात समाजाचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. धनगर समाजातील लोकांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसह धनगर समाजातील लोकांवर होणारा अन्याय तसेच मेंढपाळावर होणारे प्राणघातक हल्ले समाजाच्या विविध प्रकारच्या अडचणी यावर विचार विनिमय होणार आहे.
तरी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व पक्षीय समाजबांधवांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन अमोल कारंडे, ओबीसी सेलचे राम वाकसे यांनी केले आहे. यावेळी सचिन हाके, शरणू हांडे, धनाजी खरात, दादा बुरुंगळे, भिमा बंडगर, अमित नरुटे, आदित्य खांडेकर आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून १४ ठिकाणांहून निघणार संचलन; उत्सव व शस्त्रपूजनाचेही आयोजन
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सोलापूर शहरातून १४ ठिकाणांहून संचलन काढण्यात येणार आहे. तसेच शहरात १४ ठिकाणी विजयादशमी उत्सव व शस्त्रपूजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
रा. स्व. संघाच्या १४ नगरांतून हे कार्यक्रम होणार आहेत. रविवार, २ ऑक्टोबर रोजी केशव नगर, पंचमुर्ती नगर (जुना विडी घरकुल परिसर), मल्लिकार्जुन नगर (शेळगी परिसर), दयानंद नगर (कुंभार वेस परिसर), भवानीनगर (भवानी पेठ परिसर), विक्रमादित्य नगर (दत्त चौक परिसर), अण्णाभाऊ साठे नगर (दमाणी नगर परिसर), रेवणसिद्धेश्वर नगर, हनुमान नगर (जुळे सोलापूर परिसर), संभाजी नगर (विद्यानगर -२ परिसर) भगतसिंग नगर (नवे विडी घरकुल परिसर), भावनाऋषी नगर (न्यू पाच्छा पेठ परिसर) तर मंगळवार ४ ऑक्टोबर रोजी माधव नगर (शांतीनगर परिसर) तसेच अशोक नगर (दाजी पेठ परिसर) येथे विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी शेळगी येथील बनशंकरी मंदिरापासून, बाळीवेस येथील वडार गल्लीतून, बाळे येथील डूमणे नगर बस थांब्यापासून संचलन काढण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दुसरा मंगल कार्यालय येथून संचालन निघेल. त्याचबरोबर ५ ऑक्टोबर रोजी सकाळी गोंधळी वस्ती, पंचमुर्ती मंदिर, पार्श्व भवन, दत्त चौक, द्वारका नगर, हत्तुरे वस्ती, जांबमुनी चौक, सूर्यलक्ष्मी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर येथून रा. स्व. संघाची संचलने काढण्यात येणार आहेत.
संचलनाच्या अग्रभागी भगवा ध्वज घेतलेला अश्वारूढ स्वयंसेवक असणार आहे. त्यानंतर घोषपथक आणि त्यानंतर सर्व स्वयंसेवक असे शिस्तबद्ध संचलन शहरातून १४ ठिकाणांवरून काढण्यात येणार आहे.