बदलापूर : बलात्काराच्या दुर्दैवी घटना समाजात नेहमी घडतात, ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. अशाच एका बलात्कार पीडितेने बलात्कार करणाऱ्या मुलासमोरच ऑनलाइन विष मागवून ते घेतले. यातून त्या मुलीची प्रकृती गंभीर झाली आहे. ऑनलाइन साईटवरून अशा प्रकारे सहजरित्या विष उपलब्ध होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्याला आळा बसण्यासाठी राज्य शासनाने त्वरित पावलं उचलणे गरजेचे आहे.
उल्हासनगरच्या माणेरे भागात राहणाऱ्या महेंद्र वसंत भोईर (वय 24) याने तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा अत्याचार केले. त्यानंतर अत्याचार करणाऱ्याने महेंद्रने लग्नाला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महेंद्र वसंत भोईर असं पिडीतेवर अत्याचार करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे. 2018 पासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. एप्रिल 2022 रोजी प्रियकराने स्वतःच्या कारमध्ये बसवून पीडितेला फिरण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर तिच्यावर कारमध्येच अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित भयभीत होऊन रडत असतानाच प्रियकराने तिची समजूत काढत लग्नाचे आमिष दाखवून वेळ मारून नेली.
अत्याचार करणाऱ्या समोरच तिने हे विष पिले. अत्याचार करणारा आरोपी हा शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीवर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ऑनलाइन साईट वरून अशा प्रकारे विष सहजरीत्या उपलब्ध होत असतील तर ते खूपच घातक आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बलात्कार पीडित तरुणीने ऑनलाइन साईटवरून विष मागवत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. उल्हासनगरसध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणाऱ्या तरुणावर बदलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र त्याला अजून अटक करण्यात आली नाही.
तरुणीची महेंद्रशी उल्हासनगरमध्ये ओळख झाली, त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान याचा फायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून महेंद्र याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. पीडित तरुणीने लग्नाबाबत विचारताच महेंद्र टाळाटाळ करून लागला. अखेर आरोपी महेंद्रच्या कारमध्येच पीडितेने विष पिले.
24 सप्टेंबर रोजी पुन्हा आरोपी महेंद्र याने कारमध्ये बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. त्याच वेळी पीडितेने पर्समध्ये असलेले विष कारमध्येच प्राशन केले. घाबरलेल्या आरोपी महेंद्र याने पीडितेला तातडीने कारमधून घरी सोडले. अखेर तरुणीची प्रकृती खालावतच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बदलापूर पोलिसांनी आरोपी महेंद्र भोईर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरुणीने गुगलवर सर्च करून “xxx xx बुटी डॉट कॉम या ऑनलाइन साईड वरून 50 ग्राम विष ऑर्डर केले आणि तिला त्याची डिलिव्हरी पण देण्यात आली. आता ज्या साईटवरून पीडितेने हे विष मागवले त्याचा पोलीस तपास करत आहेत.