□ दुहेरी जलवाहिनीचा मक्ता कोल्हापूरच्या लक्ष्मी कंपनीला
सोलापूर – उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची निविदा 640 कोटी रुपये कामाची निविदा कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग कंपनीने सर्वात कमी 635 कोटी रुपये दराने भरली आहे. त्यामुळे याच कंपनीला काम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, लक्ष्मी कंपनीला काम दिल्यास कोर्टात जाणार असल्याचे हैदराबादच्या डीएनएस कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता कोर्टकचेरीच्या नादात हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे. DNS company to go to court over monopoly; Solapur double water channel project likely to be stalled again
उजनी ते सोलापूर 110 किमी अंतरावर एकूण 170 एमएलडीची पाइप लाइन घालण्यात येणार आहे. या कामासाठी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने 801 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. परंतु, यापेक्षा कमी दराने निविदा जाहीर करण्यात आली. निविदा जाहीर झाल्यानंतरच ही निविदा एका कंपनीला समोर ठेवून काढण्यात आल्याचा सूर काही कंपन्यांनी काढला होता.
यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. यासाठी हे टेंडर सुमारे महिनाभर रखडले होते. या कामासाठी एकूण पाच मक्तेदार कंपन्यांनी निविदा भरली. यापैकी एक अपात्र ठरली. याबाबतचा अहवाल जीवन प्राधिकरणकडून जुलै महिन्यातच आला होता. मात्र मंत्रालयातून निरोप आल्यामुळे वित्तीय लिफाफा खुला झाला नव्हता.
अखेर मंगळवारी स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील, सहायक अभियंता उमर बागवान, मुख्य वित्तीय अधिकारी मनिष कुलकर्णी यांच्या सहीने लिफाफा खुला झाला. यात सर्वात कमी दर कोल्हापूरच्या लक्ष्मी सिव्हील इंजिनिरिंगचा ठरला आहे. त्यामुळे याच कंपनीला काम मिळण्याची शक्यता आहे.
□ अपात्र का ठरवले कळवले नाही : खान
आम्ही 100 कोटी कमी रकमेने निविदा भरली होती. आमच्याकडे कोणत्याही कागदपत्रांची विचारणा केली नाही. आम्हाला कोणत्या कारणास्तव अपात्र ठरवले याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात बुधवारी कोर्टात जाणार असल्याचे डीएनएस कंपनीचे एम.डी. समीर खान यांनी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांसाठी उद्या गुरुवारी मतदान
□ 38 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात!
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद, आणि अभ्यासमंडळाच्या विविध 38 जागांसाठी 75 उमेदवार रिंगणात उतरले असून यासाठी उद्या गुरुवारी (दि. 29) सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत शहर व जिल्ह्यातील एकूण 16 केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सभा व निवडणूक विभागाच्यावतीने अधिकार मंडळांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
सिनेटच्या पदवीधर मधून 10 पैकी अनुसूचित जातीची एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक लागली आहे. खुला प्रवर्गातून 5 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, डीटीएनटी प्रवर्गाच्या एक जागेसाठी तीन उमेदवार, ओबीसीच्या एक जागेसाठी दोन उमेदवार तर महिला प्रवर्गाच्या एक जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.