सोलापूर : अजित पवार कधी कुठला झटका देतील काही सांगता येत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. पवार हे भाजपसोबत पुन्हा जाणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर ‘माझे व अजित पवारांचे नाते जिव्हाळ्याचे आहे. पण अजितदादा काय करतील हे शरद पवारांनाही कळले नाही, ते मला कसे कळणार ?. त्यांच्या मनातले पवार साहेबांना देखील कळत नाही. त्यामुळं दादा कधी झटका देतील हे सांगता येत नसल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. Will Ajit Pawar go with BJP again? MLA Shahajibapu Patil has no work except listening to kirtan and speeches
दरम्यान अजित पवारांना आता भाषणे व इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकणे हेच काम राहिलंय, असेही ते म्हणाले. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल देखील शहाजीबापूंना विचारण्यात आले. यावेळी सांगोल्यातून 15 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी बिकेसी मैदानावर जाणार असल्याचे म्हटले. दसरा मेळाव्याला पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा विचार ऐकणाऱ्यांनी BKC मैदानावर यावं असेही शहाजी पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ऐतिहासिक प्रतिसाद मिळणार असल्याचे शहाजी पाटील म्हणाले.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या आपल्या संवादामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या तणावपूर्ण काळातही चर्चेचा विषय ठरलेले शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांसंदर्भात केलेल्या विधानावरून शहाजीबापूंनी विनोदी टिप्पणी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातल्या विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर कुणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरु झाली तर मी आधी उद्धव ठाकरेंचं ऐकेन आणि नंतर एकनाथ शिंदेंचं ऐकेन. अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही. ”
दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानाचा संदर्भ घेत शहाजीबापूंनी सांगोल्यात बोलताना खोचक टोला लगावला आहे. “अजित पवारांना आता ही दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकणं हेच काम राहिलंय. भाषणं ऐकण्याशिवाय अजित पवारांना दुसरं काही काम उरलं नाहीये. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. पण ते कसं करायचं असतं ते त्यांना अजून कळत नाहीये. कारण अजित पवार कायम सत्तेवर राहिले आहेत. ते अजित पवारांना समजलं, पण हे अजून समजेना”, असं शहाजीबापू म्हणाले.