अक्कलकोट : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमिताने महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास नागरिकानी भेट द्यावी, असे आवाहन सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी येथे केले. Akkalkot. Exhibition of rare photographs of Mahatma Gandhi’s life journey
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती हा कालावधी “सेवा पंधरवड़ा” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर, जिल्हा प्रशासन, सोलापूर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वाहनतळ येथील जागेत आयोजित महात्मा गांधीजीच्या जीवनप्रवासतील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी खासदार डॉ महास्वामी बोलत होते.
राष्ट्रपिता गांधीजीच्या 153 वी जयंतीनिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोचा विशेष उपक्रमातून तीन दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.
उदघाटन खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळचे सचिव श्यामराव मोरे, निवासी नायब तहसिलदार विकास पवार, महावितरणचे उप अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, भूमी अभिलेखचे उप अधीक्षक श्री शिंगणे आणि केंद्रिय संचार ब्यूरोचे निवृत्त अधिकारी सतीश घोडके उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खासदार महास्वामी म्हणाले की, सेवा पंधरवड़ा निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. याचा एक भाग म्हणून आज येथे आयोजित गांधीजीच्या जीवनावरील प्रदर्शनमध्ये स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबंधित महत्वपूर्ण घटना, त्यांनी भेट दिलेल्या व सत्याग्रह केलेल्या ऐतिहासिक स्थळाविषयी माहिती देणाऱ्या दुर्मिळ चित्र आहेत. ते फक्त आपल्याला या प्रदर्शानामधून बघायला मिळतात. या प्रदर्शनाची माहिती सर्व माध्यम व पदाधिका-यानी जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, या सेवा पंधरवडा कालावधीत शासनाच्या विविध विभागातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजीच्या जीवनांशी संबधित घटना, त्यांनी भेट दिलेली ठिकाणे, तसेच त्यांनी केलेल्या सत्याग्रह विषयीची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन खूप चांगले असून सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच यातून बोधही घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले की स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे भक्त महात्मा गांधीजी यांच्या कार्याची प्रेरणा येथून घेऊन जातील.
सूत्रसंचालन व आभार क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले. दर्शनाच्या उदघाटनानंतर शाहीर भैरव मार्तंड सांस्कृतिक कला मंडल तर्फे महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछ्त्र मंडलाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, मनोज निकम, सनी सोनटक्के, प्रवीण घाडगे, मंडळ अधिकारी ओंकार माने, तलाठी पंचप्पा म्हेत्रे, अभियंता अमित थोरात, जंनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे, सहायक जनसंपर्क अधिकारी सोमशेखर जमशेट्टी, केंद्रिय संचार ब्यूरोचे जे एम हन्नुरे उपस्थित होते.