□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदा
पंढरपूर :कारखाना चालवणारा माणूस म्हणून अभिजित पाटील यांची ओळख झालीय. अभिजित पाटील यांनी २५०० रुपये दर जाहीर करून कारखानदारांची कोंडी केली. ही कोंडी माजी आमदार प्रशांत परिचारकांनी फोडली. Abhijit Patel’s sugar dilemma was broken by attendants; ‘Pandurang’ will give rate of 2700 to 2800 Solapur Pandharpur
अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत येणाऱ्या ऊस हंगामात २५०० रुपये दर जाहीर करून कारखानदारांची कोंडी केली होती. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक साखर कारखाना २७०० ते २८०० रुपये दर येणाऱ्या सीजनमध्ये देणार असल्याची घोषणा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.
साखर कारखानदारांत ऊस दराची स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यादरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सभासदांना २५०० रुपये भाव देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इतर कारखानदारांची मोठी कोंडी झाली होती. कोट्यावधी रुपयाचे कर्ज असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना जर पंचवीसशे रुपये दर देत असेल तर विठ्ठल पेक्षा कमी कर्ज असलेल्या कारखान्याने किती द्यावा? हा प्रश्न निर्माण झाला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विठ्ठलच्या निवडणुकीत २५०० रुपये दर जाहीर केल्यानंतर पंढरपूरच्या आसपासच्या सर्वच साखर कारखानदारांनी अभिजित पाटील यांची कोंडीही केली होती. पाटील यांची विठ्ठलवर सत्ता आली तर आपल्या देखील साखर कारखान्यांना विठ्ठलच्या बरोबरीने उसाला दर द्यावा लागेल, त्या भीतीने पाटलांना साखर कारखानदारांनी असताना कडाडून विरोध केला होता. त्यांचे पॅनल पराभूत करण्यासाठी सर्व कारखान्याचे कारखानदारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.
विठ्ठल कारखाना कर्जात असताना दोन वर्षा मागील शेतकऱ्यांच्या उसाचे बिल बिल हे अभिजित पाटील यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. असे कर्मवीर सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी येणाऱ्या हंगामात आपल्या सभासदांसाठी २७०० ते २८०० रुपये दर देण्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदा
विठ्ठल आणि पांडुरंग कारखान्यामध्ये दराची स्पर्धा ही जुनीच आहे. विठ्ठलने २५०० रुपये भाव जाहीर केल्यामुळे पांडुरंग कारखान्याचा सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना जादा दर मिळणार आहे. या स्पर्धेचा फायदा हा शेतकऱ्यांना होणारा आहे. येणाऱ्या काळात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.