सोलापूर : देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येत असताना दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.2) सायंकाळच्या सुमारास घडली. Horrific accident while bringing darshan of Goddess of Tuljapur; Two youths of Solapur were killed on the spot
शनिवारी सायंकाळच्या सुमारास एसटीने मोटरसायकलीला पाठीमागून धडक दिल्याने आई व बहिणीला दर्शनासाठी घेऊन जाणारा एक १५ वर्षांचा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा त्याच रोडवर तळे हिप्परगानजीक मेजरसाब धाब्याच्या समोर भीषण अपघात झाला.
दुचाकी व वाळूवाहतूक हायवा टिपरच्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोघे युवक जागीच ठार झाले. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की दोघे उडून एकमेकापासून दूर-दुर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडले होते. मोटरसायकल दुसरीकडे पडली होती. डोक्यांची कवटी फुटून मेंदू बाहेर आले होते. काळीज हेलावून टाकणारी हे भीषण दृश्य पाहण्याकरिता एकच गर्दी झाली होती. दृश्य पाहून अनेकाचे काळीज चिर झाले.
रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय-२२) व व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती (वय-२४,दोघे रा. नवीन विडी कुंभारी, सोलापूर) असे या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
एम.एच.१३.डी.क्यू. ४०१० ही अशोक लेलँड वाळूवाहतूक हायवा तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येत होती. दुचाकी वाहनावरून हे दोघे मयत युवक तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाले होते. मेजरसाब धाबा समोर ते अचानक या मालवाहतूक ट्रिपर गाडीच्या आडवे आले. त्यामुळे या गाडीची दुचाकीस मागून जोराची धडक बसली.
या धडकेत ते दोघेही मोटरसायकल वरून रस्त्यावर पडले होते. डोके फुटून मेंदू बाहेर आला होता. सोबतचे साहित्य रस्त्यावर विखुरले होते. या अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले.
मृतदेह ॲम्बुलन्समध्ये घालून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली. शासकीय रुग्णालय सुद्धा नातेवाईकांनी व मित्रमंडळीने एकच गर्दी केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ तामलवाडीजवळ एसटीच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार ;आई व बहीण जखमी
सोलापूर : सोलापूर-मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथे देवदर्शन आटोपून दुचाकीवरून ट्रिपल सीट तुळजापूरहून येत असताना एसटीच्या धडकेने किशोरवयीन तरुण ठार तर त्याची आई आणि बहीण असे दोघी जखमी झाले. हा अपघात काल शनिवारी (ता.1) दुपारच्या सुमारास घडला.
योगेश संतोष बेल्लारे (वय १७ रा.सारोळा जि.लातूर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची आई सुवर्णा बेल्लारे (वय ३५) आणि बहिण वैष्णवी संतोष बेल्लारे (वय १४ रा.सारोळा) या दोघी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शासकीय सोलापूरातील दाखल करण्यात आले.
योगेश बेल्लारे यांच्यासह तिघेजण आज दुपारी मार्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर तिघेजण दुचाकी वरून तुळजापूरकडे निघाले होते. तामलवाडीच्या अलीकडे सोलापूरहून तुळजापूर कडे जाणाऱ्या एमएच१४-बीटी-३४३० या एसटीच्या धडकेने तिघेजण जखमी झाले. त्यांना मुकुंद कांबळे (शेजारी) यांनी सोलापुरात दाखल केले असता त्यापैकी योगेश हा उपचारापूर्वी मरण पावला.
मयत योगेश बेल्लारे हा १० वीत शिकत होता. त्याच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ गॅसवर कपडे सुकविताना भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – पावसात भिजल्यानंतर अंगावरील कपडे गॅसवर सुकविताना भाजून जखमी झालेली तरुणी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी (ता.1) सकाळी मरण पावली.
भाग्यश्री विक्रम ढवाण (वय २० रा. हुंडेगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ती पावसात भिजली होती. घरातील गॅसजवळ अंगावरील कपडे सुकवित असताना गाऊन पेटल्याने ती भाजली होती. तिला उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून २३ सप्टेंबर रोजी सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.