अक्कलकोट / रविकांत धनशेट्टी
युवा नेत्या शितलताई सिद्धाराम म्हेत्रे यांनी महिला सक्षमीकरणासह, शिक्षण, शेती, आरोग्य, बेरोजगार आणि रोजगार आर्थिक उन्नतीसाठी व गोर गरिबांना न्याय देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात प्रयत्नशील आहेत. Shitaltai Mhetre fulfills mother’s wishes with the aim of making poor – underprivileged women self-reliant
शीतलताई आपले आजोबा स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या आशीर्वादाने, वडील माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात कायापालट करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.
त्यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले असून एमआयटी पुणे येथे झाले आहे. एज्युकेशन अॅडमिनिस्ट्रेशन या विषयावर सिंबोसिस कॉलेज येथे पोस्ट ग्रॅज्युएशन देखील झाल्या आहेत. महिलांच्या प्रश्नांबद्दल त्यांच्या मनात सतत जिद्द व तळमळ आहे. ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.
महिलांना आर्थिक स्वाललंबी बनवणे हेच त्यांचे ध्येय आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे स्वप्न घेऊन त्या विविध समाजकार्याच्या माध्यमातून कष्ट घेत आहेत. महिलांचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्या म्हणाल्या. अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती भाग आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा हा तालुका आहे.
त्यामुळे महिलांसाठी फारसे सकारात्मक चित्र या तालुक्यात नाही. त्यामुळे महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या संदर्भात ठोस काम उभे करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यासाठीच त्यांनी अम्मा सुवर्णा- लक्ष्मी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. यातून प्रत्येक गरजू महिलेला स्वावलंबी बनवण्याची त्यांची धडपड आहे. तसेच त्यातून रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून देत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आज काल ग्रामीण भागात महिलांना कायद्याची माहिती नाही. शिक्षण नाही. त्याची माहिती त्यांना करून देणे खूप गरजेचे आहे. तसा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नाही, तो केला जाईल. या संदर्भात आगामी काळात फाउंडेशन निश्चितच चांगले काम करेल. विद्यार्थी विद्यार्थिनींना या तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी फारसे चांगले वातावरण नाही. त्यासाठी एखादे एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन केंद्र, पदवीधर तरुणांसाठी, आयटी फिल्डमधील तरुणांसाठी करिअर गाइडन्ससारख्या गोष्टी मनामध्ये धरून योजना आखत आहेत.
त्याचबरोबर या तालुक्यामध्ये महिला या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. ही बाब निदर्शनास आली आहे. त्यांना आरोग्याबद्दलची जाणीव करून देण्याबरोबरच या तालुक्यामध्ये एखादे चांगले हॉस्पिटल उभारण्याचा मानस म्हेत्रे परिवाराचा आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात प्रत्येक गावात बचत गट आहेत. काही ठिकाणी प्रतिसादा अभावी बंद आहेत तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बंद आहेतत्या सर्व ठिकाणांची माहिती घेतलेली आहे. उदा. त्यांच्या अडचणी
जाणून घेतल्या. ते आता चालू होत आहेत. एकूणच महिला बचत गटाच्या माध्यमातून जर महिलांना मदत झाली तर खऱ्या अर्थाने महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. त्यांना उद्योग करता येऊ शकतो. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज असते. ते आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत.
□ आईची इच्छा…
वडील सतत राजकारण आणि सामाजिक कार्यात व्यस्त असल्याने आईच्या संस्कारात मी जास्त वाढले. आई वडील हेच माझे आदर्श आहेत. माझी आई स्वर्गीय सुवर्णाताई म्हेत्रे हिची मी तालुक्यातील महिलांसाठी काहीतरी करावे अशी खूप इच्छा होती ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे त्या सांगतात.
अक्कलकोट तालुक्यातील गावोगावी रेशनकार्डची अडचणी खूप मोठे आहेत तर समाधान शिबिराचेच माध्यमातून त्या आम्ही सोडवत आहोत. सलगरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केलेला आहे. त्या ठिकाणी अडीचशे जणांना रेशन कार्ड वाटप केले आहे. हा पॅटर्न तालुकावर राबविण्यात येणार आहे.
शितलताई म्हेत्रे यांनी अम्मा फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मैंदर्गी येथे ८० महिलांना पापडउद्योग सुरू केला. काँपोरेट सेक्टर मधील जॉब नंतर राजकारणात सक्रीय महिलांना काम व शिक्षण यावर भर दिला. गावभेटीतून समस्या समजावून घेतल्या. स्त्रियांसाठी आरोग्य शिबीर घेतले. आजार कळत नाहीत. हेल्थ तपासणी नियमित केले पाहिजे यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.
दारिद्रय रेषेखालील लोकांना योग्य लोकांना लाभ मिळाला पाहिजे. जे बोगस लाभार्थी आहेत त्यांनी आपला हक्क सोडला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती कळवतो. जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने मैंदर्गी येथे महिलांसाठी शिलाई मशीन शिकविणे सुरू केले आहे. लाभार्थीना १५०० रूपये स्टायपंड सह प्रमाणपत्र मिळणार आहे, असे शितलताई म्हेत्रे यांनी सांगितले.