मुंबई : येत्या 5 ऑक्टोबरला शिवसेनेचा शिवतिर्थावर दसरा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी यावर भाष्य केले. राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. असे ते म्हणाले. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय? असा सवालही त्यांनी केला. शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील, असेही ते म्हणाले. ‘If NCP puts strength for Shiv Sena’s Dussehra gathering… Pawar’s big statement is political
शिवसेना फूटल्यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर मोठा वाद होतोय. दोन्ही गटामधून आमचीच शिवसेना म्हणून दावा केला जात आहे. अशात येत्या बुधवारी (ता.५ ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईतील बीकेसी मैदानावर तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडणार आहे. यासाठी दोन्हही गटाकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी केली जात आहे.
हा दसरा मेळावा दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनला आहे. दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. याच दरम्यान, भाजपकडून शिवसेनेवर आरोप केले जात आहेत की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केलाय. भाजपने केलेला हा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले, मी दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा देत आहे. दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र ५ तारखे नंतर लोकांच्या हिताची कामेही व्हायला हवीत. लोकांचे प्रश्न सुटावीत, अशी आशा नागरिक म्हणून मी व्यक्त करत असल्याचे म्हटले.
शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं पैसे देवून आणली जातीलही, पण शिवतिर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील. शिवसेनेच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागाही पुरणार नाही. पण शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून मेळावा घेत असतील तर राष्ट्रवादीला ताकद लावण्याची काय गरज? असा प्रतिसवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 …म्हणून हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणायचे ! देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कारण
वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम् का म्हणायचे याचे कारण सांगितले आहे. आज वर्धा येथे “वंदे मातरम” मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. वंदे मातरम् हा स्वातंत्र्याचा मुलमंत्र होता. या घोषणेनंतर बंगालची फाळणी हाणून पाडण्यात आली होती. ही चळवळ, आता केवळ चळवळ नसून गुलामगिरीच्या सर्व साखळ्या तोडून काढायची आहे, असेही ते म्हणाले.
‘वंदे मातरम’ परत आपल्याला व्यवहारात आणायचे आहे. हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ असा वापर करून गुलामगिरीच्या निशाणी पुसून टाकायच्या आहेत, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वंदे मातरम’ मोहिमेचा शुभारंभ केला.
सर्व शासकीय कामकाजामध्ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत हा बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी टीका केली आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा येथे ‘वंदे मातरम’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. ‘वंदे मातरम’ हा स्वातंत्र्याचा मूलमंत्र होता. बंगालची फाळणी झाली होती, त्यावेळी हजारो लोक उपस्थित होते. त्यावेळी लोकांची गर्दी होती, ही गर्दी नेत्याची वाट , पाहत होती. त्यावेळी एकाने ‘वंदे मातरम’ अशी घोषणा दिली. त्यानंतर सर्वच लोकांनी ‘वंदे मातरम’ची घोषणा दिली आणि या घोषणेनंतर बंगालची फाळणी हाणून पाडली.
दरिद्री नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा, शेवटच्या व्यक्तिसेवा , हीच लोकसेवा हा मूलमंत्र गांधीजींनी दिला. त्याच विचारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा मोहिमेची सांगता केली.