उस्मानाबाद : सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून रातोरात स्टार झालेले अनेक लोक आतापर्यंत पाहिले आहेत. परंतु, व्हिडीओ बनवल्यामुळे निलंबनाची कारवाई झाल्याची घटना घडलीय. उस्मानाबादमधील महिला कंडक्टरवर निलंबनाची कारवाई केलीय. सध्या जोरदार चर्चा आहे. Reel production became expensive, female conductor suspended, see Reel Osmanabad Mangalgiri
ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे महिला कंडक्टरला महागात पडलं आहे. त्यामुळे तिला नोकरी गमवावी लागली आहे. मंगल सागर गिरी असं या महिला कंडक्टरचं नाव आहे. त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केलं आहे. कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव आहे.
निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. परंतु, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/reel/Ci37S-lPJNF/?utm_source=ig_web_copy_link
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण- तरुणी प्रसिद्धी मिळवत आहेत. रिल्स बनवण्याची सध्या खूपच क्रेझ आहे. हे रिल्स बनवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी अनेक जण वाटेल ते करत आहेत. परंतु, प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. असाच प्रकार या महिला कंडक्टरसोबत घडला आहे.
एसटी महामंडळाच्या गणवेशात व्हिडीओ काढून तो या महिला कंडक्टरने इन्स्टाग्रामवर अपलोड केला. आधीच सोशल मीडियावर क्रेझ असलेल्या या महिला कंडक्टराचा हा व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला. परंतु, प्रसिद्धीच्या नादात आपण काय करतोय याचे भान नसलेल्या या महिला कंडक्टरवर महामंडळाने थेट निलंबनाची कारवाई केली. एवढंच नाही तर या महिला कंडक्टरने केलेल्या व्हिडीओमुळे वाहतूक कंट्रोलरवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली.
माझ्यावर झालेली कारवाई चुकीची असून काही संघटनांच्या वादातून ही कारवाई झाल्याचा आरोप मंगल गिरी यांनी केला आहे. तसेच माझ्यासारखे अनेक जण एसटी मंडळात आहेत. जे माझ्यासारख्या रिल्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. पण त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान मंगल गिरी यांच्यावरील कारवाईनंतर सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येत आहेत. मंगल गिरी यांच्यावरील कारवाईचा चाहत्यांकडूनही निषेध व्यक्त होत आहे.