अक्कलकोट : तालुक्यातील जेऊर येथे तलवारी विक्रीसाठी निघालेला तरुण बमसिंग पंचाक्षरी बमगोंडा (वय 27) या तरुणास ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सोळा हजार रुपये किमतीचे चार तलवार हस्तगत केल्या आहेत. Akkalkot youth arrested with four swords crime
ही कारवाई जेऊर – करजगी रोडवर करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक काळे, पोलीस हवालदार अजय भोसले, आठवडा बाजारात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निघाले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बमगोंडा फिरत होता. यापूर्वी या तरुणावर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकारणात त्याला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांकडून दिली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमधील अवैधपणे शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रदीप काळे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध पथके नेमली.
जेऊर येथे बाजार पेट्रोलिंग व अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर बातमी मिळाली. जेऊर येथील राहणारा बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा वय २७ वर्षे, यास १६,०००/- रू किंमतीचे, एकुण ०४ नविन तलवारींसह रंगेहात पकडले. त्याच्याविरूध्द महादेव शिंदे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेने अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन शस्त्र अधिनियम कलम ४,२५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पो.स. ई. रेवणसिध्द काळे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, पो.स. ई. रेवणसिध्द काळे, पो.हे.कॉ. अजय भोसले, पो. ना. अल्ताफ शेख, पो.ना. सुभाष दासरे, पो. ना. नबिलाल मियॉवाले, पो. कॉ. महादेव शिंदे यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ गॅसवर कपडे सुकविताना भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
सोलापूर – पावसात भिजल्यानंतर अंगावरील कपडे गॅसवर सुकविताना भाजून जखमी झालेली तरुणी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज शनिवारी सकाळी मरण पावली.
भाग्यश्री विक्रम ढवाण (वय २० रा. हुंडेगाव ता.परंडा जि.उस्मानाबाद) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ती पावसात भिजली होती. घरातील गॅसजवळ अंगावरील कपडे सुकवित असताना गाऊन पेटल्याने ती भाजली होती. तिला उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून २३ सप्टेंबर रोजी सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.