मुंबई : मुंबईतील राजकीय दसरा मेळाव्यांसाठी महामंडळाच्या अनेक बस राजकीय नेत्यांनी बुक केल्या आहेत. पण, त्यामुळे सामान्य जनतेला ताण सहन करावा लागत आहे. दसऱ्याच्या सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांना बस नसल्याने खोळंबून राहावे लागत आहे. नेत्यांच्या मेळाव्यानिमित्त सामान्यांची होरपळ होतीय. याबाबत तक्रार आणि कैफियत कुठे मांडायची हा सवाल उपस्थित होत आहे. Common people’s uproar on the occasion of leaders’ meeting; Sanjay Raut Babasaheb Thackeray has one seat empty in both the gatherings
बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहतूक प्रचंड महागली आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने १८०० एसटी गाड्या व तीन हजार खासगी गाड्या बुक केल्या आहेत. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरल्याचे समजते. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी दोन्ही गटांकडून सुमारे चार हजार बस आणि १० हजार छोटी वाहने मुंबईत येण्याचा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी सायंकाळी होणाऱ्या या मेळाव्यांसाठी दोन्ही गटांकडून लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणले जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ नये, यासाठी दोन हजारांहून अधिक पोलीस मुंबईतील रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, आज बीकेसी मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार, अशी माहिती समोर आली आहे. या रिकाम्या खुर्चीवर कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री चाफ्याची फुले वाहतील आणि नमस्कार करतील. ही खुर्ची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात येणार असून हेच आमचे बाळासाहेबांना अभिवादन असेल असे शिंदेनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचं आसन लावण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये तुरुंगात असलेले संजय राऊत यांची खूर्ची लावण्यात आलेली आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आपापल्या मेळाव्याला गर्दी खेचण्यासाठी उभयतांकडून प्रयत्न झाले. मात्र प्रत्यक्षात कुठे किती गर्दी होते, हे संध्याकाळी स्पष्ट होईल.
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. मात्र त्यांची आठवण ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून त्या मेळाव्यात एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यासपीठावर येतील तेव्हा एका चाफ्याच्या फुलांचा हार या खुर्चीला घालतील, असं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र फक्त आमच्याच मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार दिसून येतील, असा दावा शिंदे गटामार्फत करण्यात येतोय.