मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत राऊत हे न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. कोर्टाने आज हा आदेश दिला आहे. हा आदेश म्हणजे शिवसेनेला मोठा झटका आहे. संजय राऊतांचा दसरा हा कोठडीतच होणार आहे. A blow to Shiv Sena, Sanjay Raut’s ‘Dussehra’ letter in custody
राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. ते जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या जामिनावर थेट 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला राऊतांना हजेरी लावता येणार नाही.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला याआधी ईडीने विरोध केला होता. राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने न्यायालयात याआधी प्रत्युत्तर दिले होते. ‘कारवाई टाळण्यासाठी संजय राऊत या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून काम करत होते. संजय राऊत प्रभावी नेते आहेत, त्यांना जामीन मिळाला तर ते पुरावे नष्ट करतील,’ असे ईडीने म्हटले आहे.
या प्रकरणात सरकारी मालमत्तेच्या मोबदल्यात संजय राऊत यांना वैयक्तिक लाभ झाला आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचारांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो, त्यामुळे राऊत यांनी जो दिलासा मागितला आहे, तो अयोग्य आहे. या प्रकरणात प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. पैशाचा माग राहू नये, यासाठी ते पडद्यामागून काम करत होते. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला कोणताही लाभ झालेला नाही, हे त्यांचे म्हणणे ग्राह्य मानता येणार नाही, असे ईडीने म्हटले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सध्या हा खटला महत्त्वाच्या पातळीवर आहे. दररोज नवे पुरावे समोर येत आहेत. या पुराव्यातून या प्रकरणात राऊत यांनी कशी भूमिका निभावली हे पुढे येत आहे. त्यामुळे या स्थितीत त्यांना जामीन देणे योग्य होणार नाही, असे मत ईडीने नोंदवले होते. राऊत सध्या पत्राचाळ पुर्नविकास प्रकरणात अटकेत आहेत. ईडीने ज्या एक कोटी साठ हजार रुपयांची विचारणा केली होती, त्याचा खुलास करण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला होता.
पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली.
पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक ॲनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते. याप्रकरणी ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
□ रेल्वेचा प्रवाशांना झटका, विदर्भात जाणाऱ्या गाड्या 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द
पुणे रेल्वे विभागातील वाल्हा ते नीरा या दुहेरी मार्गाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 6, 16, 17 व 20 ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द केली आहे. 20 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही सायंकाळी 7 वाजता सुटेल. तर पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे गाड्या ही 19 ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली.