Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर । ‘इंजेक्शन’ देताच आरोग्य खात्याची झोप उडाली तुकाराम मुंढे

Solapur. As soon as the 'injection' was given, the health department lost sleep, Tukaram Mundhe

Surajya Digital by Surajya Digital
October 8, 2022
in Hot News, सोलापूर
0
सोलापूर  । ‘इंजेक्शन’ देताच आरोग्य खात्याची झोप उडाली तुकाराम मुंढे
0
SHARES
389
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय कर्तव्यात कठोरपणा व शिस्त आणणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नव्या फतव्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. Solapur. As soon as the ‘injection’ was given, the health department lost sleep, Tukaram Mundhe

राज्यातील सरकारच्या सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्यावेळी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अशी तंबी मुंडे यांनी दिल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानपदाचे इनचार्ज म्हणून पदभार घेतल्यानंतर मुंडे यांनी या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचारी हे रात्रीच्या वेळी हजर असायलाच हवेत, असा फतवा काढला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडे हे अडगळीत पडले होते परंतु शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ते ॲक्टिव्ह झाले आहेत. रात्रीच्या वेळेतील डॉक्टर पुन्हा आरोग्य केंद्रात वा रुग्णालयात हजर असलाच पाहिजे, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना अखंड उपचार मिळावे या भूमिकेतून मुंडे यांनी या तपासणीचे आदेश जारी केले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

त्यानुसार आरोग्य विभागाचे उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपासून संपूर्ण यंत्रणा गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागातील ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन कामावरील डॉक्टर जागेवर उपस्थित आहेत का? याची तपासणी करत होते. महत्त्वाचे म्हणजे या सर्वांचे व्हिडिओ चित्रण व फोटो काढण्यास सांगण्यात आल्याने चौकशी करणारे डॉक्टरही प्रत्यक्षात जागेवर गेले होते व कोणत्या वेळी गेले तेही स्पष्ट झाले.

 

■ हा तर रूग्णांचा हक्कच

 

याबाबत मुंडे म्हणतात की, आरोग्य सेवा चोवीस तास मिळणे हा रुग्णांचा हक्क आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर जागेवर उपस्थित राहतात का? हे तपासणे गरजेचे होते. डॉक्टर जर रात्रीच्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर असतील तरच रुग्णांना उपचार मिळणे शक्य आहे. अनेकदा शेतात काम करताना साप चावतात.

विंचू दंश वा गर्भवती महिलांचे प्रश्न असतील किंवा रात्री काही दुर्घटना घडली तर संबंधित डॉक्टर हा रुग्णालयात वा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणे अनिवार्य आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वा ज्या ठिकाणी निवासी डॉक्टर व परिचारिका उपस्थित असणे आवश्यक आहे तेथे त्यांची राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छतागृहांची परिस्थिती काय आहे. याचाही आढावा घेऊन योग्य त्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.

□ डॉक्टरांसाठी व्यवस्था नाही

 

जवळपास ६० आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी करण्यात आली असून यात तेरा डॉक्टर कामावर उपस्थित नसल्याचे आढळून आले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टरांनी दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी डॉक्टरांना राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे सांगितले.

स्वच्छतागृहांची बहुतेक ठिकाणी बोंब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कुठे स्वच्छता गृहाला दार नाही तर कुठे कडी नाही. काही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही तर पावसाळ्यात अनेक निवासी ठिकाणी गळती लागलेली असते. आम्ही डॉक्टर आहोत, जनावरे नाही की गोठ्यात बांधून ठेवले अशा प्रतिक्रिया काही डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.

 

Tags: #Solapur #Assoonas #injection #health #department #lost #sleep #TukaramMundhe#सोलापूर #इंजेक्शन #आरोग्यखाते #झोप #उडाली #तुकाराममुंढे
Previous Post

नाशिक अपघात : मृतांचा आकडा 11 वर, राज्य सरकारकडून 5 तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर

Next Post

सोलापुरात 14 ऑक्टोबरपासून प्रिसिजन गप्पा; अभिनेते मकरंद अनासपुरेंसह हास्यवीरांचे प्रमुख आकर्षण

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात 14 ऑक्टोबरपासून प्रिसिजन गप्पा; अभिनेते मकरंद अनासपुरेंसह हास्यवीरांचे प्रमुख आकर्षण

सोलापुरात 14 ऑक्टोबरपासून प्रिसिजन गप्पा; अभिनेते मकरंद अनासपुरेंसह हास्यवीरांचे प्रमुख आकर्षण

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697