मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सुचना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या पक्षातील कोणत्याही नेत्याने अथवा प्रवक्त्यांनी याविषयावर बोलणे टाळावे असे राज ठाकरेंकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. Raj Thackeray’s suggestion not to react on Dhanushyabana, when the time comes…politics
निवडणूक आयोगाने काल शनिवारी शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गटाला शिवसेना हे नाव थेट वापरण्यासही मनाई केली. यावरुन मागील 24 तासांपासून राजकीय रणकंद सुरु आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हद्वारे संवाद साधत त्यांची रोखठोक भूमिका मांडली.
परंतु मागील 24 तासात राज ठाकरे यांनी काहीही वक्तव्य केले नव्हते. तसेच मनसेची कोणतीही भूमिका समोर आली नव्हती. मात्र, आता राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
“सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.” असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. याचाच अर्थ राज ठाकरे हे सर्व पाहत असूनही वेट अँड वॉचची भूमिका घेणे पसंत करत असल्याचे दिसत आहे. मात्र, लवकरच ते यावर उघड भूमिका घेतील हेही दिसत आहे.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरे यांनी लिहलं आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना असा संदेश दिला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर राज कधी आणि काय भूमिका घेतात? याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे सर्वात मोठी मागणी केलीय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पर्यायांपैकी एक नाव आम्हाला द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच उगवता सूर्य, मशाल, त्रिशूळ या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह आम्हाला लवकर द्या. आम्हाला जनतेसमोर जायचे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरुन म्हटले आहे.
या संवादाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुढचा धोका सांगितला. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे. तुम्ही जागे राहा, अजिबात झोपू नका. शांत डोक्याने आत्मविश्वासाने ही लढाई जिंकायची आहे, त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कुणीच नसेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मात्र शिंदे गटाकडून अजून कोणतिही अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आज उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी चिन्ह आणि नाव देखील जाहीर केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आली नाही.
□ ‘वडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलाने एका मिनिटात गमावले’
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्यात आले आणि दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. वडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलाने एका मिनिटात गमावले. आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ते चिन्ह गेले, असेही ते म्हणाले.