सोलापूर – झाडाची फांदी तोडताना विद्युत वाहिनीच्या शॉक बसल्याने ४५ वर्षीय इसम मरण पावले. ही घटना रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे शनिवारी (ता. 8) दुपारच्या सुमारास घडली. Solapur. One died of electric shock while cutting a tree branch
राजेंद्र भगवान कांबळे (वय ४५ रा. वडाळा ता.उ.सोलापूर) असे मयताचे नाव आहे. ते दुपारी दोन वाजेच्या सुमारात रानमसले येथे झाडाच्या फांद्या तोडत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यांना वडाळा येथे प्राथमिक उपचार करून बेशुद्धावस्थेत सुधीर (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापुर्वी मरण पावले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ दुचाकी अपघात; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
दुचाकी वरून पडून जखमी झालेले सिद्धाराम शिवानंद सुतार (वय ३५ रा. सुनीलनगर, एमआयडीसी) हे शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी पहाटे मरण पावले. २ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून सत्तरफूट रोड ते एमआयडीसीच्या दिशेने निघाले होते.
आकाशवाणी केंद्राजवळ पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्रकाश तेलंग (मित्र) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या अपघाताची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ स्पीडब्रेकर वरून पडल्याने विवाहिता जखमी
पतीच्या दुचाकी पाठीमागे बसून प्रवास करताना स्पीडब्रेकर वरून खाली पडल्याने अंबुबाई प्रमोद परशे (वय२८ रा मनगोळी ता.द.सोलापूर) ही विवाहिता जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी (ता. 7) सकाळच्या सुमारास घडला. ती पतीसोबत वडकबाळ ते वांगी असा प्रवास करीत होती. वडकबाळ पासून २ कि.मी. अंतरावरील स्पीडब्रेकर जवळ हा अपघात घडला. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.
□ केगाव येथे मोटारीच्या धडकेने दुचाकी चालक जखमी
केगाव (ता.उत्तर सोलापूर) येथील सैन्यभरती अकॅडमी जवळ स्कॉर्पिओ मोटारीच्या धडकेने दुचाकी वरील चंद्रकांत जनार्दन भोसले (वय २२ रा.खेड) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.7) सकाळच्या सुमारास घडला. चंद्रकांत हा दुचाकी वरून खेड ते केगाव असा प्रवास करीत होता. समोरून एमएच४५-एन-७५७५ही स्कार्पिओ धडकल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.
□ ढुसणी मारल्याने वृद्ध जखमी
घराजवळ मोकाट गाय ढुसणी मारल्याने रमाकांत आप्पाराव गुमटे (वय ६५ रा. उत्तर कसबा,टिळक चौक) हे जखमी झाले. शनिवारी (ता. 8) सकाळी त्यांच्या घराजवळ हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सूर्यकांत (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली आहे.