अकलूज / डी. एस. गायकवाड
काय झाडी ? काय डोंगर ? काय हॉटेल ? सारं ओके ! मध्ये आहे या डायलॉगने संपूर्ण भारताला भुरळ पाडली आणि रातोरात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील प्रसिद्धीच्या झोतात आले. आता त्यांची ब्रँड अँबेसिडरपदी निवड झालीय. वाचा सविस्तर कोणत्या ब्रँड अँबेसिडरपदी निवड झालीय. Struggle considered as religion: Shahjibapu Patil chosen as brand ambassador Foundation Chief Minister
ग्रामीण भागातील त्यांचा बोलण्याचा ढंग लोकांना आवडू लागला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील त्यांच्या सभा गाजू लागल्या. याच आमदार शहाजीबापू पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. शिंदे फाउंडेशनच्या ब्रँड अँबेसिडरपदी निवड झाली.
नुकतेच त्यांना डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पत्र देऊन गौरविण्यात आले. आजपर्यंत अनेक मोठमोठे सेलिब्रिटी आपण ब्रँड अँबेसिडर म्हणून जाहिरात करताना पाहत होतो. मात्र आता ग्रामीण भागातील अस्सल गावठी भाषेतील आमदार शहाजीबापूंचे शब्द असंख्य रुग्णांसाठी लाभदायक ठरणार आहेत. अगदी ग्रामीण भागातून आलेल्या शहाजीबापू यांची ओळख नेहमी संघर्ष करणारा नेता म्हणून राहिली आहे.
पण महाराष्ट्रातील उदंड नेतृत्वात त्यांची ओळख पुसटशी झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्या बंडात देखील कणखरपणा दाखवत बापूंनी संबंध महाराष्ट्र चिंतेत असताना आपल्या डायलॉगने हास्याचे फवारे उडवून दिले.
सांगोल्यासारख्या दुष्काळी पट्ट्यात काम करत असताना कोट्यावधीची कामे त्यांनी केली आहेत. पाणी प्रश्न हा या तालुक्याचा गंभीर प्रश्न असला तरी या प्रश्नाला प्राधान्य देत असताना दुसरे महत्त्वाचे प्रश्न देखील त्यांनी दुर्लक्षित होऊ दिले नाहीत हे महत्त्वाचे आहे. तालुक्यातील जनतेसाठी नेहमी काहीतरी केले पाहिजे, अशा धडपडी वृत्तीचे त्यांचे नेतृत्व आहे. आज हा नेता राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या गावठी मराठी भाषेच्या माध्यमातून जावून पोहोचला आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक सभेतील त्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी ओसंडून झालेली पहावयास मिळते. ग्रामीण भागातील मराठी गावठी माणदेशी भाषेला त्यांच्यामुळे मान सन्मान मिळताना दिसतो आहे.
विधानसभा निवडणुकीत अनेक वेळा पराभव होऊन सुद्धा बापूंनी आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. संघर्ष हाच धर्म समजला आणि कोणत्याही निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता जनतेप्रती आपली असणारी बांधिलकी नेहमी त्यांनी मनात ठेवली. त्यामुळे ते संघर्ष करत गेले आणि १९९५ च्या निवडणुकीमध्ये देखील निवडून आले. आणि त्यानंतर २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तांतर यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अनेक नेते मोठेपणा गाजवत असताना मोठाड बोलताना दिसतात मात्र शहाजीबापू यांनी आपली परिस्थिती कधीही दडवली नाही. जे सत्य आहे तेच जगासमोर मांडले. त्यातून त्यांची अनेक वेळा खिल्ली देखील उडवण्यात आली, मात्र त्यांनी आपल्या जीवन जगण्याचा ढंग बदलला नाही.
नुकतीच त्यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या नेतृत्वाचा पूर्णपणे सन्मान होताना दिसत आहे. ही बाब सांगोला तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाचीच म्हणावी लागेल इतकेच…
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले; विनोदवीर आमदाराने बारामतीकरांवर डागली तोफ
विस्तवाशी खेळण्याचा मोह नाही आवरत
सोलापूर : सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवार व अजित पवारांवर टीका केली आहे. आम्ही पवारांची चप्पल सुद्धा उचलून त्यांच्या पायापाशी ठेवली होती. मात्र पवार काका पुतण्याने 20 वर्षे मला घरात कोंडून ठेवले. त्यांनी कायम शेकापच्या गणपतराव देशमुखांना मदत केली, त्यामुळे ते निवडून येत होते. याआधी राष्ट्रवादी नेते दीपक साळुंखेंनी बोलताना बापूंना डिवचले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील विनोदवीर ठरलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी । बारामतीकरांवर तुफान फटकेबाजी केली. वाकीशिवणी येथील एका कार्यक्रमात काका-पुतण्यावर तोफ डागत असतानाच शहाजीबापूंना शरद पवारांवर टीका न करण्याचे आवाहन एका नेत्याने केले. पण त्यानंतर त्यांचे पित्त चांगलेच खवळले. माझा जन्म मुळीच चुलीजवळ झाला आहे. त्यामुळे विस्तवाशी खेळण्याचा मोह मला नाही आवरत असे म्हणताच हास्याची लाट उसळली. झाले असे की- सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ शनिवारी (ता. 8) शहाजीबापूंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक साळुंखे यांनी आमदार पाटील यांना यापुढे जपून बोलावे. शक्यतो शरद पवारांवर टीका न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पुढे जाऊन शहाजीबापू म्हणाले की माझा जन्मच चुलीजवळ झाला आहे. त्यामुळे मला विस्तवाशी खेळण्याचा मोह आवरत नाही. पंढरपूर येथील विठ्ठल कारखान्यावर पवार आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या पायापुढे चपल्या काढून ठेवायचो. तरीही पवार काका पुतण्यांनी राजकारणात २० वर्ष मला कोंडून ठेवले. यांचे साक्षीदार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आहेत. राजकारणात पवारांनी माझे एकप्रकारे राजकीयदृष्ट्या खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप केला.
■ आधी बोलले, नंतर दैवत मानले
दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीत शेकाप उमेदवाराच्या विरोधात जाऊन शहाजीबापू यांना मदत केली होती. त्यामुळे साळुंखे यांनी त्यांना शरद पवार यांच्यावर टीका न करण्याचे आवाहन केले. तरीही त्यांनी आपल्या माणदेशी शैलीमध्ये पवारांचा समाचार घेतला. नंतर मात्र त्यांनी सारवासारव करत शरद पवार माझे दैवत आहेत, यापुढे त्यांच्या विषयी बोलणार नाही, अशी स्पष्टोक्ती केली.
यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे, संचालक धनंजय काळे, दिनकर चव्हाण, हणमंत पाटील आदी उपस्थित होते. सांगोला कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी अभिजीत पाटील यांनी दोनशे रुपयांचा हप्ता या वेळी जाहीर केला.
■ राग अजूनही डोक्यात…
सांगोल्यात प्रत्येक वेळी पवार यांनी शहाजीबापूंच्या विरोधात शेकापला पाठिंबा देत राहिल्याने शहाजीबापू यांची राजकीय कोंडी होत होती. पवारांच्या मदतीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख विजयी होत आणि शहाजीबापू पराभूत होत असत. आपल्या राजकीय वनवासाला शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच जबाबदार असल्याचा राग शहाजीबापू पाटील यांच्या डोक्यात कायम आहे. त्यामुळेच पवारांवर टीका करणे बंद करा म्हंटल्यावर पवार काका पुतण्याने २० वर्षे मला घरात डांबून ठेवले आणि आता मला त्यांच्यावर बोलू नका असं हा म्हणतोय, असं म्हणत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली.