□ स्वकीयांनीच पकडले कात्रीत, मंगळवेढ्याची झाली पुनरावृत्ती
• पंढरपूर : सुरज सरवदे
आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंजूर केलेला सरगम चौकातील ओव्हर ब्रिजला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात भोसले चौक येथे माजी मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या उपस्थिती मध्ये व्यापाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत परिचारक यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला ओव्हर ब्रिजला विरोध दर्शविण्यात आला. Bhosle’s opposition to the ambitious plan of Prashant Prachikaran Pandharpur Sargam Chowk
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केलेला ओव्हर ब्रिजला माजी मिस्टर नगराध्यक्षनी विरोध दर्शवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरगम चौक येथील रेल्वेच्या ब्रिज खाली पावसाळ्यात पाणी साटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. अनेक वर्षांपासून नागरिकांना पाण्यातून गाड्या घेऊन जावं लागतं आहे. उपनगरात जाणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नाहीतर पद्मावती बागेसमोरून वळसा घालून जावं लागतं. तसेच सरगम चौक आणि इंदिरा गांधी चौकात होणारे ट्राफिक जाममुळे पंढरपूरकर वैतागले आहेत.
सरगम चौकातून ब्रिज करण्यापेक्षा भोसले यांनी पर्यायी मार्ग सांगितला. गेली साडे सात वर्षे भोसले यांच्याकडे पंढरपूरचे नगराध्यक्ष पद परिचारक यांनी दिले होते. मात्र परिचारक यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला विरोध केल्यामुळे परिचारकांची कोंडी झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
स्वकीयांनी परिचारक यांना कात्रीत पकडल्यामुळे मंगळवेढ्याची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. आमदार समाधान अवताडे यांना दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत स्वकीयांनी विरोधात भूमिका घेतली होती. त्यामागे पंढरपूरकरांचा हात होता असे बोलले जात आहे. तशीच परिस्थिती आता पंढरपुरात निर्माण झाली आहे. परिचारक यांनी साडे सात वर्षे साधनाताई भोसले यांना नगराध्यक्ष केले. कोट्यवधी रुपयांची कामे साधनाताई भोसले यांच्या कार्यकाळात झाली. मात्र भोसले चौकातून जाणाऱ्या ब्रिजला विरोध दर्शविला आहे.
पंढरपुराच्या विकासाला विरोध नाही मात्र व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये तसेच या ब्रिजला पर्यायी मार्ग नागेश भोसले यांनी सुचवला आहे. नागेश भोसले यांनी हीच भूमिका परिचारक विरोधी असल्याचे बोलले जात आहे.
● नागेश भोसले यांना दिलीप धोत्रे सोबत घेणार का ?
नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी रान उठवले आहे. पंतप्रधान आवास योजनेवरून सत्ताधाऱ्यांना त्यांनी अडचणीत आणले आहे. पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता संपादन करायची असेल तर नुसती परिचारक यांच्यावर टीका करून सत्तांतर होणार नाही. त्यासाठी गेल्या ५-१० वर्षातील कारभारावर टीका करावी लागेल. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करावी लागेल. पंतप्रधान आवास योजनेसारखी प्रकरणे बाहेर काढावी लागतील.
मात्र नागेश भोसले हे दिलीप धोत्रे यांचे मित्र असल्यामुळे टीका करण्यात अडचण येत होती. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना अकडती भूमिका घ्यावी लागत होती. असे असताना काका-बापू आघाडी करणे दिलीप धोत्रे यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल. त्यामुळे नागेश भोसले यांना दिलीप धोत्रे सोबत घेतली असे वाटत नाही.