Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘साहेब दसऱ्याला पोळ्याही केल्या नाहीत, अनुदानाचे पैसे लवकर द्या’

'Saheb, Dussehra grant money soon Shinde Sarkar Hingoli

Surajya Digital by Surajya Digital
October 10, 2022
in Uncategorized
0
‘साहेब दसऱ्याला पोळ्याही केल्या नाहीत, अनुदानाचे पैसे लवकर द्या’
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ सहावीत शिकणाऱ्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या प्रताप कावरखे नावाच्या पोराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे. यात त्याने शेतकऱ्याचे दु:ख मांडले आहे. आईने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या पण नाही दिल्या. आई म्हणते इथे विष खायला पैसे नाहीत. तसेच अनुदानाचे पैसे लवकर द्या. मग दिवाळीला आई पोळ्या करेल मग तुम्ही पण या पोळ्या खायला, असं त्याने पत्रात म्हटलंय. ‘Saheb, Dussehra did not even make hives, give the grant money soon Shinde Sarkar Hingoli

शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्य सोबतच कुटुंबातील लहान चिमुकल्यांवर सुद्धा होत आहे. सहावीमध्ये शिकणा-या मुलाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र लिहिलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे अशी भावनिक साद या चिमुरड्याने मुख्यमंत्र्यांना घातली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तो शेतकऱ्याच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थी आहे. त्याने यावर्षी पावसाने सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत,अशी खंत व्यक्त केली आहे.

यावर्षी पावसामध्ये सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ सहावीत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; व्यक्त केली ‘ही’ खंत..

बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे. सणाला पोळ्या तर सोडा पैसेही नाहीत. तसेच जवळील जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे वडीलांनी फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, अशी मागणीही या पत्रातून चिमूकल्‍याने केली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जुन-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जमिनी खरडुण गेल्या तर काही जमिनीतील पिके पाण्यात गेली प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेल्या देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडे निधी देखील आला आहे, मात्र दसरा संपला आता दिवाळी आली तरी हा निधी वाटप करण्यात आला नाही. आता दिवाळीच्या आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

》 शिंदे सरकारला चिमुकल्याचे पत्र, पोराच्या चेह-यावर समाधान आणा, शेतकरी संघटनेची मागणी

सांगा शिंदेसाहेब कुठे आहे शेतकर्‍यांचं सरकार..?
हे पत्र वाचलं आणि मन सुन्न झालं..

शिंदे साहेब गलिच्छ राजकारण पुन्हा करा आधी या लहानग्याची हाक तरी ऐका..!
पत्र वाचल्यावर डोळ्यात पाणी आलं. आज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकर्‍याची ही अवस्था आहे..

तुम्ही सत्तेच्या धुंदीत आहात. तुम्ही दररोज हा माझ्या घेतो तो माझ्यासोबत येतोय हे दाखवण्यात व्यस्थ आहात.. तुम्ही म्हणता हे आपलं शेतकर्‍यांचं सरकार आहे.. सांगा शिंदे साहेब कुठे आहे शेतकर्‍यांचं सरकार..?

मध्यंतरी तुम्ही तुमच्या नातवावर टिका केली म्हणून मोठा आगतांडव केलात. त्यांचं भावनिक वातावरण ही केलंत. आता हा ही चिमुकला तुमचा नातुच समजा ना.. आपल्या कुटुंबातील कोणी आहे असं समजुन त्या चिमुकल्याचे हट्ट नक्की पुरवा..

शिंदे साहेब राज्यात अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडलाय. तो आशेने पाहतोय त्याला मदत करण्यास प्राधान्य द्या, तुम्ही आता हे राजकारण करत बसुन शेतकर्‍यांना खाईत लुटण्याचे पाप करू नका..

हिंगोलीचा प्रताप कावरखे हा एक उदाहरण आहे. परंतु इतक्या लहान वयात त्याने जे डोळ्यासमोर पाहिलंय दुखः ते त्यांनं मांडलंय आणि ते विचार करायला लावणारं आहे..

तुम्ही म्हणालात आपले सरकार आले सणांवरचे विघ्न हटले. साहेब पुरणपोळी त्याच्या ताटात देण्यात कसलं विघ्न येतंय तेही पहा की एकदा..! असे अनेक प्रताप आहेत. ज्यांना सण सुदीचा गंध मिळेना गरिबीमुळे.

जमल्यास लवकर लक्ष द्या.. कोवळ्या मनाची घालमेल बघवत नाही.. मदत करा.. एका शेतकर्‍याच्या पोराच्या चेहर्‍यावर समाधान आणा.. शेतकर्‍यांचं सरकार ही फक्त घोषणाच ठरू नये हिच इच्छा..

– रणजित बागल
राज्य प्रवक्ता,स्वाभिमानी शेतकरी संघटना,युवा आघाडी

Tags: #Saheb #Dussehra #didnoteven #makehives #grant #money #soon #ShindeSarkar #Hingoli#साहेब #दसरा #पोळा #अनुदान #पैसे #लवकरद्या #शिंदेसरकार #हिंगोली #पत्र #मुख्यमंत्री
Previous Post

चीनच्या किंगचा दुबईत कारभार, केरळच्या दोघांनी पाहिला लेमनचा दरबार

Next Post

अखेर शिंदे अन् ठाकरे गटाला मिळालं नाव, अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697