□ उद्धव ठाकरेंसाठी गुडन्यूज, काँग्रेस विजयी करुन दाखवणार
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हाचे तीन पर्याय सुचवण्यास सांगितलं आहे. Finally Shinde and Thackeray group got the name, Andheri by-election Mahavikas Aghadi will fight together
अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी वर्षा लटके यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे. 13 ऑक्टोबर रोजी त्या निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत, असे परब यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप व राष्ट्रवादीच्या नेत्या उपस्थित होत्या.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक लवकरच होणार आहे. निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मदत करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. नाना पटोलेंनी याबाबत म्हटले की, सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ही जागा काँग्रेसची आहे. पण सेनेला सहकार्य करू. काँग्रेस उद्धव ठाकरे गटाला 50 ते 60 हजार मतांनी विजयी करणार आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आता उगवता सूर्य आणि मशाल हे दोनच पर्याय आता उपलब्ध आहेत, पण आता उगवता सूर्य हे चिन्हही बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत. ठाकरे-शिंदेंची मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं असून मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. यावरच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना ‘पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले’, असं म्हटलं आहे. बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव म्हणाले आहेत की, पहिल्याच प्रयत्नात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पूर्णपणे जिंकले आहेत. याचं कारण म्हणजे आम्हाला जे नाव मिळालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नाव राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव राहिलं. आम्ही तीन जी निशाणी मागितली होती. त्यातली मशाल ही निशाणी आम्हाला मिळाली. त्यामुळे पहिल्या डावात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. म्हणून आम्ही आनंदी आहोत, असं ते म्हणाले आहेत.
नवीन नाव आणि चिन्ह याबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, रविवारी शिवसेना नेत्यांची बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हेच नाव सुचवलं होत. आम्ही निवडणूक आयोगाला सुचवलेल्या चिन्हात पहिल्या क्रमांकावर त्रिशूळआणि तीन नंबरवर मशाल होती. मात्र आम्हाला त्रिशूळ मिळाली नाही, माशाला हे चिन्ह मिळालं. सुरेश भटांचा एक गाणं आहे, उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली, आता आम्ही मशाल पेटवू, असं ते म्हणाले आहेत.
यावरच आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. खरी लढाई पहिली जिंकली. त्या म्हणाल्या की, उषःकाल होता होता, काळरात्र झाली. शिवसैनिकांनो पेटवा आयुष्याच्या मशाली असं त्या म्हणाल्या आहेत. पेडणेकर म्हणाल्या, ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे.