□ फौजदार चावडी डी.बी पथकाची कामगिरी
सोलापूर : तुळजापूर येथे देवदर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेवून सोलापूर शहर व जिल्हा तसेच आजूबाजूचे परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील १७ मोबाईल असे एकूण २ लाख १ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला. 17 stolen mobile phones of devotees going to Tuljapur seized; Two persistent thieves arrested in Solapur
फिर्यादी बार्शी येथील सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब अनंतराव देशपांडे हे रविवारी ( दि.९ ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर एस.टी.स्टॅन्ड येथे बार्शीला जाणारे एस.टी.मध्ये चढत असताना पाठीमागून अचानक एका अनोळखी इसमाने खिशातील मोबाईल हिसकावून घेवून पळुन गेला. फिर्यादीने आरडा ओरडा केला परंतु तो गर्दीत घुसून पळून गेला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यामधील इसमांचा शोध घेत असताना, जुना कारंबा नाका ते प्रभाकर महाराज मठाचे दरम्यान नाकोडा रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या मैदानात दोन इसम मोबाईल विकण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावेळी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्याचेकडे एकूण १७ मोबाईल मिळून आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या मोबाईलची तपासणी केली असता ते मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेले असल्याचे सांगितले. आनंद अंबादास मंजेली (वय-३२, रा. जुना अक्कलकोट नाका, शनि मंदिरासमोरील झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर) व अंबादास भगवान शिंदे (वय-३२,रा.जोशी गल्ली, भोलाभाई चौकाजवळ, रविवार पेठ,सोलापूर) असे या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील,दु पोनि विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस नाईक डोके, बाबर, बागलकोटे, बडुरे, व्हटकर, मोरे, लवटे, खरटमल, चव्हाण, चानकोटी, दराडे, गायकवाड यांनी केली आहे.
□ जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा !
#जागतिक #कन्या #surajyadigital
#children #worldgirl #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा #मुलगी #कन्यादिन
□ मुलगी म्हणजे करूणा आणि प्रेरणा यांचा संगम असते. मुलगी कुटुंबाचे आयुष्य आणि समाजाचे भविष्य असते. तिला स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षा मिळवून देऊया. स्त्री जन्माचे स्वागत करुन तिच्या पंखांना बळ देऊया. जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा !