बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडचे भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी स्वतःला गोळी झाडून जीवन संपवले. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. अजून आत्महत्येचे कारण समोर आले नाही. Beed shook, BJP city president took Bhagirath Biyani by shooting himself
आज मंगळवारी (ता. 11) सकाळी स्वत:वर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली. बियाणी यांना खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टराना अपयश आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून नेमकी आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या जाण्याने बीडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.
बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे भगीरथ बियाणी नेहमी हसतखेळत कर्तृत्व निभावणारे व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. या दुर्देवी घटनेने बीड शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे. पण भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. दरम्यान, या घटनेमुळे भाजपमध्येही खळबळ उडाली असून खासदार प्रीतम मुंडे या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे.
बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. काल सोमवारी रात्री आपल्या कुटुंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झोपले. आज पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने कुटुंबाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना कुटुंबाने रुग्णालयात नेले मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले. यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत.
भगीरथ बियानी यांनी बीडपासून सुमारे 25 किमी लांब असलेल्या त्यांच्या एमआयडीसी परिसरातील घरामध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या घरी पिस्तुल सापडलं असून त्यामधून गोळी झाडल्याचं स्पष्ट आहे, अशी माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली आहे.