सोलापूर : दमाणी नगर परिसरातील सोनी सिटीमध्ये राहणार्या रेल्वे अभियंत्याचे घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असा एकूण 12 लाख 48 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही चोरी दि. 1 ते 5 ऑक्टोंबर या दरम्यान घडली. Solapur. A railway engineer’s house was broken into and a compensation of twelve and a half lakhs was looted
सुरज सिताराम तिवारी (वय 33, रा. सोनी सिटी डी विंग, दुसरा मजला प्लॉट नं. 202/8, दमाणी नगर सोलापूर) यांनी फिर्यादी दिली. मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे रेल्वे मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. 1 ऑक्टोंबर रोजी फिर्यादी त्यांच्या संपूर्ण परिवारासह तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथील भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यांच्या सोलापूरमधील घराचे मुख्य दरवाजाला कडी कोयंडा लावून गेलेले होते.
दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तु असा एकूण 12 लाख 48 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ घर फोडून ८७ हजारांचा एवेज चोरीला
सोलापूर : दशक्रिया विधीला गेलेल्या महिलेच्या घरातील 87 हजाराचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना रविवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी घडली.
किर्ती चंद्रशेखर कामत (वय- 37, रा. 23, सनमान नगर, मारूती मंगल कार्यालयाजवळ, जुळे सोलापूर) ही महिला तिच्या नंदेच्या पतीच्या दशक्रिया विधीसाठी घराला कुलूप लावून विजापूर रोड सैफूल येथे गेली असताना अज्ञात चोरट्याने तिचे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे हार आणि 2 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट असा एकूण 87 हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून नेला अशी फिर्याद किर्ती कामत यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरकुटे करीत आहेत.