मुंबई : शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना * असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला * शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे* असे नाव मिळाले आहे.. त्यांना पक्षचिन्ह म्हणून मशाल मिळाले आहे. त्यामुळे आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार आहे. shield-sword symbol to the Shinde group; Whose symbol was first read Uddhav Thackeray Eknath Shinde political
शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव दिलं आहे. शिंदे गटाच्या चिन्हाचा पहिला फोटो समोर आला आहे. दरम्यान, आम्हाला एकदम योग्य चिन्ह मिळालं आहे. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि कोणी अंगावर आलं तर तलवार समोर धरायची, असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले.
Election Commission of India allots the 'Two Swords & Shield symbol' to Eknath Shinde faction of Shiv Sena; they were allotted the name 'Balasahebanchi ShivSena' yesterday. pic.twitter.com/2Xi2C5TS4T
— ANI (@ANI) October 11, 2022
शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यात आता शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उद्धव ठाकरे गटाला कालच ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले आहे. तर नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.
शिंदे गटाला काय चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. दोन तलावर आणि एक ढाल असं हे चिन्ह आहे. मुळात शिंदे गटाने तळपता सूर्य हे चिन्ह पहिल्या पसंतीचं सांगितलं होतं. मात्र उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यात गोंधळ होण्याची शक्यता होती. उगवता सूर्य हे डीएमके पक्षाच चिन्ह आहे. तर तळपता सूर्य हे मिझोरम पार्टीला देण्यात आलेलं आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाला, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असून आम्ही जिंकलोय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने * बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. तर चिन्ह आज मिळणार होते. ते आज ढाल – तलवार चिन्ह मिळाले.
दरम्यान ढाल-तलवार हे चिन्ह पिपल्स डेमोक्रेटीक मुव्हमेंटला देण्यात आलेलं होतं. मात्र या पक्षाची नोंदणी २००४ मध्ये रदद् करण्यात आली होती. तेव्हापासून हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या फ्री सिम्बॉलच्या यादीत होतं.
》 उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींचा फोन
अंधेरी मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंना पाठिंबा द्यायचा असा निर्णय सोनिया गांधींनी घेतला आहे, असं थोरात यांनी सांगितलं.