• सोलापूर : ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ शुगर मिल्स साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तर झाला शिवाय या कार्यक्रमादरम्यान आ. जयकुमार गोरे आणि माजी आ. दिलीप माने यांच्यात राजकीय जुगलबंदीत रंगली. Invitation to Dilip Mane to join BJP; Political Solapur admits that Shiv Sena entry decision was wrong
या जुगलबंदीत आमदार गोरे यांनी माने यांनी मी २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत जाईन, तेव्हा माने तुम्ही माझ्यासोबत असावेत. ती इच्छा कशी पूर्ण करायची, हे मला इथली काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी बाकीच्या विषयावर काही बोलणार नाही. गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला, आम्ही कुठं कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी माने यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले. त्यामुळे आगामी काळात माने यांच्या राजकीय प्रवेशाबाबत विविध तर्क विर्तकांना उधाण येणार आहे.
कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ भाजप आमदार जयुकमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते सदाशिव पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. या कार्यक्रमात माने यांनी आ. गोरे यांच्याबरोबर असलेले मैत्रीचे किस्से सांगितले.
दिलीप माने म्हणाले, मी, सदाशिव पाटील आणि आ. गोरे चांगले मित्र आहोत. सदाशिव आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत. माझा अजून काय पत्ता नाही. बघू पुढे. एकदा घाई करून चूक झाली आहे,’ असे वक्तव्य करून २०१९ मध्ये शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकला, अशी कबुली दिली. त्यावर आमदार गोरे म्हणाले की, माने मी सांगेन की, राजकारणात आपले अस्तित्व महत्त्वाचे असते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कुणाचे कितीही गणित असले तरी राजकारणात निवडून येणारे गणितच आपण मांडायचे असते. आता तुम्ही काही करा; पण निवडून येणारे गणितच मांडा. कुठे (कोणत्याही पक्षात) मांडायचे तिथे मांडा; पण निवडून येणारे गणित मांडा. आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला आम्ही कुठे कमी पडणार नाही.
माने राजकारणात गडबड, घोटाळे होत असतात. पण, धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. अपयश येते, पण त्याचा फार विचार करायचा नाही. मी भाजपमध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला भाजप प्रवेशाचे निमंत्रणच देईन, माझी काही अडचण नाही. पण, मी काय ते सांगायला येथे आलो नाही. मी भाजपमध्ये काम करतो, तेव्हा मला मनापासून आनंद होतो. खूप चांगल्या पध्दतीचा अनुभव मला भाजपमध्ये आल्याचे ते म्हणाले. आ. गोरे यांनी दिलीप माने यांना दिलेल्या आमंत्रणामुळे माने यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीबाबत पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे.
□ माने कोठूनही या; मात्र विधानसभेत या
आ. गोरे म्हणाले की, जाता जाता एवढेच सांगेन की, माझी एक इच्छा आहे, मी २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत जाईन, तेव्हा माने तुम्ही माझ्यासोबत असावेत. ती इच्छा कशी पूर्ण करायची, हे मला इथली काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी बाकीच्या विषयावर काही बोलणार नाही. पण, आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या.. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला, आम्ही कुठे कमी पडणार नाही.
■ राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस; महाराष्ट्रात आजही पावसाचा अलर्ट
कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात आज पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सकल भागांसह शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गांधीनगर वळीवडे तसेच पन्हाळा भागाला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर बारामतीच्या मुर्टी, मोरगाव यांसह अनेक ठिकाणी ढगफुटी पाऊस पडला. दरम्यान, अजून काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीड, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. राज्यात आजही (12 ऑक्टोबर) पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.