□ खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामींच्या मागणीला यश
□ हुबळी – निजामुद्दीन – हुबळी साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू
सोलापूर – सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी कर्नाटक एक्स्प्रेस केवळ एकच रेल्वे आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाण्यासाठी नवीन रेल्वेची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून हुबळी – नवी दिल्ली ही रेल्वे सेवा सोलापूर मार्गे करावी, अशी मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी केली. It is time for a new train to go from Solapur to Delhi
KK Express MP
हुबळी-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस’ला मंगळवारी (ता. ११) संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला.
या गाडीचा कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यातील प्रवाश्यांना याचा लाभ होईल, यासाठी वारंवार खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मागणी केली होती. त्या मागणीस यश आले असून हुबळी – निजामुद्दीन – हुबळी ही नवी साप्ताहिक रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्याची सुविधा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून सोलापूरकरांना दिवाळी भेटच मिळाल्याची भावना खा. डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी व्यक्त केली.
ही गाडी सोलापूरमार्गे धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवी दिल्लीला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे. सोलापूरकरांना दिल्ली गाठण्यासाठी केवळ केके म्हणजेच ‘कर्नाटक एक्स्प्रेस’वर अवलंबून रहावे लागायचे. नवीन गाडी चालू झाल्यामुळे सोलापूरकरांची सोय झाली आहे.
ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी रात्री ११.५० वाजता निघेल आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी दुपारी ३.५५ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हुबळी येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हुबळी – निजामुद्दीन – हुबळी रेल्वे क्रमांक २०६५७/५८ या नवी रेल्वेस झेंडा दाखवून सुरुवात केली. सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्यासाठी प्रति शनिवारी सकाळी ८.३५ वाजता तसेच सोलापूरहून हुबळीकडे जाण्यासाठी प्रति सोमवारी रात्री ७ वाजता रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्नाटक एक्स्प्रेस शिवाय ही दुसरी रेल्वे गाडी दिल्लीस जाण्यासाठी सुविधा होणार आहे. सध्या ही गाडी साप्ताहिक असून ही गाडी दररोज सुरू करण्याची मागणी करणार असल्याचेही खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी सांगितले.
हुबळी – सोलापूरमार्गे नवी दिल्लीसाठी नवी रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या ३ वर्षांपासून खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी केली होती. ८ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे विभागीय समिती बैठकीत, १६ ऑक्टो. २०२१ हुबळी विभागीय दक्षिण पश्चिम रेल्वे समिती बैठक, १७ मार्च २०२२ अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच रेल्वे अर्थसंकल्पीय बैठकीत तसेच ८ जुलै रोजी मध्य रेल्वे विभागीय समितीत बैठकीत याबाबत मागणी केली होती.
तसेच १५ मार्च २०२२ रोजी संसदेतही याबाबत मागणी केली होती. या मागणीचा विचार करता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोलापूरकरांना दिवाळी भेटच दिल्याबद्दल खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी सर्वांचे समस्त सोलापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले. उत्तर भारत व दक्षिण भारत ( हुबळी) कडे जाण्यासाठी दुसरी रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी मी करीत होतो, त्याचा केंद्रीय नेतृत्वाने मान्य करीत नवी रेल्वेसेवा सुरू केल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर महास्वामी यांनी सांगितले.