पंढरपूर : श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा सुधारित सर्वकंष आराखडा तयार करण्यात येत आहे. Pandharpur Pilgrimage Development Plan: Drone camera footage of the temple area
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये कोणत्या सूचनांचा समावेश करता येईल या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदीर व मंदीर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करण्यात येत आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. याबाबत प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्यात येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यासाठी मंदिर , मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील घाट, बंधारे आदी ठिकाणचे ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करण्यात येत आहे. चित्रिकरणास कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन, मंदिर समिती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत चित्रिकरण करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यादृष्टीनेही आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंदीर समिती व वास्तुविशारद यांच्यामार्फत कामकाज करण्यात येणार आहे.
मंदिर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करतेवेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहा.पोलीस निरिक्षक चिमनाजी केंद्रे, मंदीर समितीचे अभियंता केतन भोंगे तसेच चितानंद सर्वगोड, महेश कांबळे उपस्थित होते.
□ कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात
#सुराज्यडिजिटल
#onions #कांदा #surajyadigital #prise #दर
मुंबई- दिवाळीपूर्वी कांद्याचे दर वाढत आहेत. घाऊक बाजारात मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याच्या दरात आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी एक किलो कांदा 15 ते 25 रुपये किलो झाला आहे. परतीचा पाऊस पडत असल्याने कांद्याची नवीन लागवड संकटात आली आहे. याचाच परिणाम म्हणून हे दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.