□ महापालिका महिला बालकल्याण विभागाची विशेष योजना !
सोलापूर : महापालिका महिला बालकल्याण विभागाच्या वतीने विविध 17 योजनां राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यतच्या 1 हजार 758 विद्यार्थिनींना यावर्षीपासून दररोज 2 रुपये प्रमाणे शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. यामुळे विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. Solapur. Attendance Allowance will be given to female and child welfare students in municipal schools
सोलापूर महापालिका महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने या वर्षात विविध 17 नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांसाठी लाभार्थ्यांकरिता नियमावली निश्चित करण्यात आली आहे. आर्थिक वर्षातील महापालिकेच्या प्रत्यक्षात उत्पन्नाच्या 5 टक्के खर्चाची तरतूद सोलापूर महापालिका महिला व बाल कल्याण विभागाच्या या विविध योजनांसाठी राहणार आहे.
पालिका प्रसूती गृहात जन्मलेल्या बालिकेस बेबी किट, पालिका शाळांमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता, विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास योजना, महापालिकेतील शाळेच्या इयत्ता पहिली ते दहावीतील मुला – मुलींना ऐतिहासिक स्थळ भेटी यासह आवश्यक अशा 17 विविध कल्याणकारी विविध योजनांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, महापालिका शाळांमधील मुलींना दररोज 2 रुपये उपस्थितीत भत्ता मिळणार आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाकडून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थिनीची आकडेवारी प्राप्त झाली आहे. एकूण 1 हजार 758 विद्यार्थिनींना यावर्षीपासून शाळा उपस्थिती भत्ता शासन नियमानुसार मिळणार आहे. यासाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.
या योजनेमुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर आर्थिक मदत होणार आहे. सोलापूर महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता योजनेसाठी वार्षिक अंदाजे 20 लाख रुपये तरतूद आहे. असे महापालिका महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी सांगितले.
आकडेवारी प्राप्त झाल्याने आता महापालिका महिला व बालकल्याण विभागाकडून या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांच्यामार्फत महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थिनींना हा उपस्थिती भत्ता मिळणार आहे असे कस्तुरे यांनी स्पष्ट केले.
सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शहरात मराठी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, तेलगू माध्यमांच्या एकूण 61 शाळा आहेत. या महापालिकांच्या विविध शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या एकूण 1 हजार 758 विद्यार्थिनी आहेत. त्यांना शाळा उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ मिळणार आहे.