मुंबई : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु असताना घोरपडेंचा मृतदेह सापडला आहे. NDRF च्या पथकाला शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे. घोरपडे यांची हत्या आहे की आत्महत्या याबाबत साशंकता आहे. घोरपडे बेपत्ता झाल्याची तक्रार शिरवळ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. Pune Satara NDRF team found the body of Panan Joint Director Shashikant Ghorpade
नीरा नदीच्या पात्रात काल संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरु होता. काल गुरुवारी सकाळपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय होता. त्यानंतर गुरुवार संध्याकाळपासून पोलिसांनी नीरा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत होते. घोरपडे यांच्या शोधासाठी एनडीआरएफकडून आज शोधमोहीम सुरु करण्यात येणार होती. एनडीआरएफचे जवान शशिकांत घोरपडे यांचा पाण्याखाली शोध घेण्याच्या तयारीत असतानाच नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
शशिकांत घोरपडे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. गुरुवारी (13 ऑक्टोबर) पहाटे नातेवाईकांनी ही तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात नीरा नदीच्या जवळ एका हॉटेलपासून एक व्यक्ती पुलाकडे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शशिकांत यांनीच नदीपात्रात उडी मारल्याचं स्पष्ट होत नव्हतं. घटनास्थळी घोरपडे यांचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले होते. त्यांच्या शोधासाठी महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिकजणांकडून प्रयत्न सुरू होता.
□ राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे होते बेपत्ता
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे हे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. घोरपडे यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. काल ते पुण्याहून सातारसाठी निघाले. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी गाडी पार्क केली आणि तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय.
पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ५०, रा. गोखलेनगर, पुणे) बेपत्ता झाले असल्याचे कळत आहे. ते मूळचे साताऱ्याचे आहेत. पुण्याहून काल बुधवारी (12 ऑक्टोबर) ते साता-याला जायला निघाले. रस्त्यात त्यांनी नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याहून निघाल्यावर सारोळा गावाजवळ गाडी थांबवून ते नीरा नदीकडे जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली असून, सीसीटीव्हीत नदीकडे जाताना जो माणूस दिसत आहे ते शशिकांतच आहेत का? याचा शोध पोलिसांची टीम घेत आहे.
शशिकांत घोरपडे बेपत्त असल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. आज गुरुवारी (13 ऑक्टोबर) पहाटे नातेवाईकांनी ही तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात नीरा नदीच्या जवळ एका हॉटेलपासून एक व्यक्ती पुलाकडे जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शशिकांत यांनीच नदीपात्रात उडी मारल्याचं स्पष्ट होत नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
घटनास्थळी मिसिंग अधिकाऱ्याचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले आहेत. महाबळेश्वर टेकर्स, शिरवळ शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनचे, भोईराज जलआपत्ती असे एकूण 45 अधिक शोध घेत आहे.
शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. बुधवारी दुपारी ते पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. नीरा नदीच्या पात्रात शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकांत घोरपडे हे आपले मित्र प्रदिप मोहिते यांच्या कारमधून (एमएच- ११- सीडब्ल्यू- ४२४४) पुणे कार्यालयातून गेले होते. नेहमी कार्यालयातून ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी येत असत. मात्र उशिरापर्यंत ते घरी न आल्याने व त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या पत्नीने शशिकांत यांच्या बंधूंना याबाबतची कल्पना दिली. त्यांनी कार्यालयात चौकशी केली असता शशिकांत हे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान कार्यालयातून गेल्याची माहिती मिळाली.
दरम्यान मित्र प्रदिप मोहिते यांच्या मोबाईलवर खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावरुन कार गेल्याचे फास्टटँगचा मॅसेज आल्याने ते साताऱ्याकडे गेल्याचे समजल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान शिदेंवाडी गावच्या हद्दीतील एका कंपनीसमोर संबंधित कार लावल्याचे तेथे चहा पिल्याचे निदर्शनास आले. यावेळी शोधाशोध केली असता शशिकांत घोरपडे यांचा ठावठिकाणा मिळू न शकल्याने श्रीकांत घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.