मोहोळ : मोहोळ शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून चावा घेवून १८ जनांना जखमी केले आहे यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 18 people injured in Mohol city, crushed dogs, Solapur Government Hospital
मोहोळ शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळ – जवळ १८ जणांना जखमी केले आहे. हा कुत्रा शुक्रवारी सकाळी मोहोळ शहरात चावा घेत सुटला. एस टी स्टॅड परिसर दत्त नगर, यशवंत नगर, आदर्श चौक अशा भागात त्याने अनेकांचा चावा घेवून गंभीर जखमी केले. ही बातमी सोशल मीडीयाच्या माध्यमातून मोहोळ शहरात वाऱ्या सारखी पसरली.
या कुत्र्याने चावा घेवून जखमी केलेल्या काहीना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे मोहोळ शहरात घबराट पसरली. यामुळेच मोहोळ नगर परिषद सतर्क झाली. कर्मचाऱ्यांना या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाचारण करण्यात आले. याबाबत कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसताना मोहोळ नगर परिषदेच्या काही तरुण कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ठार केले. यामुळे मोहोळ शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने गुरूवार (दि. १३) च्या रात्री ८ वाजल्यापासून ते शुक्रवार (दि. १४) च्या सकाळपर्यत अनेक नागरिकांना चावा घेत दहशत निर्माण केल्यामुळे शहरात घबराट निर्माण झाली आहे.
शहरातील कळसे नगर , व बसस्थानक परिसर, आदर्श चौक, सिध्दार्थ नगर, आण्णाभाऊ साठे नगर , कन्या प्रशाला, नेताजी प्रशाला परिसर, आदी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे 18-20 नागरिकांना व जनावरांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे.
नगरपरिषदेचे कर्मचारी व गावातील युवक संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी शोधत आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे संदेश सोशल मिडीयावर फिरत आहे.
“पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर प्राथमिक स्वरूपात लागणारे इंजेक्शन देऊन पुढील उपचारासाठी रुग्णांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. कारण विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन हे फक्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असते”
डॉ. पी. पी. गायकवाड –
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मोहोळ
सोलापूर । वसुबारसच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के लंपी लसीकरण होणार पूर्ण
□ जिल्ह्यात 62 जनावरांचा मृत्यू
सोलापूर : वसु बारसच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावरांची तपासणी व लसीकरण पूर्ण करणार असल्याची माहिती जि.प.चे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वेगाने तपासणी मोहीम व लसीकरण मोहीम हाती घेवून लंपीचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज अखेर 1326 जनावरांना लंपीची लागण झाली असून 474 जनावरे बरी झालेली आहेत.
एकुण 62 जनावरांचा मृत्यू झाला असून 790 जनावरे उपचाराखाली आहेत. मृत्यू झालेल्या 31 जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली असून एकूण 8 लाख 15 हजार इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. यामध्ये उत्तर सोलापूर 5, सांगोला 5, करमाळा 9, माळशिरस 8, पंढरपूर 3, माढा 1 प्रत्येकी एक पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
साखर कारखाने सुरू होत असून जिल्ह्याबाहेरील जनावरे या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर संपर्क अधिकारी नेमण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
कारखाना परिसरात नव्याने दाखल होणाऱ्या बैल व गाय वर्गीय जनावरांची माहिती तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. अशी माहिती सीईओ स्वामी यांनी दिली.
यावेळी डॉ. भास्कर पराडे (सदस्य सचिव लंपी समिती, सहा.पशुसंवर्धन अधिकारी बोरकर) उपस्थित होते.
आज अखेर 6 लाख 98119 जनावरांना वेगाने लसीकरण करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात आज अखेर 93% लसीकरण पुर्ण झाले असून साखर कारखान्यांवर दाखल होणाऱ्या जनावरांना दिपावली बसूबारसच्या पार्श्वभूमीवर तपासणी व लसीकरणाची विशेष मोहीम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून बसू बारस पर्यंत 100% लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.