सोलापूर : परीक्षेच्या निकालात त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर आता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University decided to give photo copy of answer sheet due to complaints
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात त्रुटी असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यावर विद्यापीठ स्तरावरून दुरुस्ती सुरु होती. पण, गुरुवारी (ता. १३) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. त्यांच्या मागणीनुसार आता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) धर्तीवर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी देण्याची मागणी ‘अभाविप’कडून करण्यात आली होती. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. आंदोलनाची दखल घेत विद्यापीठाने तातडीने निर्णय घेतला. तत्पूर्वी, विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्रव्यवहार करून ज्या विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी आहेत, त्यांची नावे कळविण्यास सांगितले होते. काही विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाकडे अर्ज केले होते.
तरीपण, ‘अभाविप’च्या आंदोलनानंतर विद्यापीठाने सशुल्क उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निकालातील त्रुटी व प्रवेशासंदर्भात सिनेट सदस्य सचिन गायकवाड, प्राचार्य डॉ. विकास शिंदे यांनी प्र-कुलगुरु व परीक्षा नियंत्रकांसोबत चर्चा केली. आता दिवाळी सुटीपूर्वी निकालातील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सामाजिक न्याय विभागाच्या स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रम
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना होऊन तब्बल 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑक्टोबर 1932 रोजी समाज कल्याण विभागाची स्थापना मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून झालेली आहे.
त्यामुळे हा दिवस शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत असून यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती सहायक आयुक्त कैलास आढे यांनी दिली आहे.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या सूचनेनुसार शनिवारी सकाळी 10.30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांची व्याख्याने व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन, मान्यवराचे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा/निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कैलास आढे यांनी केले आहे.