सोलापूर – राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक भागातील शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतची सत्र परीक्षा सुरु आहे. पण पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत जर विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, तर त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. त्यासंबंधीच्या सूचनाही शाळांना करण्यात आल्या आहेत. Solapur. If the session exam is canceled due to rain, the exam can be retaken, the principal-teachers should not force the children
दिवाळीपूर्वी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेतली जात आहे. पण, परतीच्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, मुलांना शाळेत यायला अडचणी आहेत. त्यामुळे आजारी असल्याने किंवा अतिवृष्टीमुळे सत्र परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनीही माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना तशा सूचना केल्या आहेत.
माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वीची सत्र परीक्षा घेतली जात आहे. पण, मागील दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी, जेणेकरून कोणाचेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
२० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळी सुट्या आहेत. परंतु, करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर अशा तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस जोरात पडत आहे. सीना, भीमा या नद्या दुथडी भरून वाहत असून ओढे-नालेही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाड्या-वस्त्यांवरील मुलांना पाण्यामुळे शाळेत येता येत नाही. परीक्षा बुडेल म्हणून काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेला येण्याचा प्रयत्न करीत असल्याची स्थिती आहे. पालकांनाही मुलांच्या परीक्षेची चिंता आहे. पण, मुलांनी व पालकांनी परीक्षेची चिंता न करता पावसामुळे परीक्षा बुडाली, तर त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद राहिल्या होत्या. १५ जूनपासून आता शाळा नियमित सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकांकडून सराव चाचणीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच दिवाळीपूर्वीची सत्र परीक्षा १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळी सुट्या आहेत. परंतु, करमाळा, माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर अशा तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस जोरात पडत आहे.
सीना, भीमा या नद्या दुथडी भरून वाहत असून ओढे-नालेही तुडुंब भरले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, वाड्या-वस्त्यांवरील मुलांना पावसाच्या पाण्यामुळे शाळेत येता येत नाही. आपली परीक्षा बुडेल म्हणून काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेला येण्याचा प्रयत्न करीत असल्याची स्थिती आहे.
पालकांनाही मुलांच्या परीक्षेची चिंता आहे. पण, मुलांनी व पालकांनी परीक्षेची चिंता न करता पावसामुळे परीक्षा बुडाली, तर त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी स्पष्ट केले आहे.
तालुक्यात किंवा संबंधित गावात मुसळधार पाऊस पडत असल्यास परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देऊन मुख्याध्यापक शाळेला सुटी देऊ शकतात. पावसामुळे शाळेत येण्यास अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक तथा शिक्षकांनी सक्ती करू नये. आपत्कालीन परिस्थितीत घेतलेल्या सुटीतील शैक्षणिक कामकाज पुन्हा भरून काढू शकतात, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
सोलापूर । वसुबारसच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के लंपी लसीकरण होणार पूर्ण
□ जिल्ह्यात 62 जनावरांचा मृत्यू
सोलापूर : वसु बारसच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावरांची तपासणी व लसीकरण पुर्ण करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वेगाने तपासणी मोहीम व लसीकरण मोहीम हाती घेवून लंपीचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. आज अखेर 1326 जनावरांना लंपीची लागण झाली असून 474 जनावरे बरी झालेली आहेत.
एकुण 62 जनावरांचा मृत्यू झाला असून 790 जनावरे उपचाराखाली आहेत. मृत्यू झालेल्या 31 जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली असून एकूण 8 लाख 15 हजार इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. यामध्ये उत्तर सोलापूर 5, सांगोला 5, करमाळा 9, माळशिरस 8, पंढरपूर 3, माढा 1 प्रत्येकी एक पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
साखर कारखाने सुरू होत असून जिल्ह्याबाहेरील जनावरे या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर संपर्क अधिकारी नेमण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
कारखाना परिसरात नव्याने दाखल होणाऱ्या बैल व गाय वर्गीय जनावरांची माहिती तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. अशी माहिती सीईओ स्वामी यांनी दिली. यावेळी डॉ. भास्कर पराडे (सदस्य सचिव लंपी समिती, सहा.पशुसंवर्धन अधिकारी बोरकर) उपस्थित होते.
आज अखेर 6 लाख 98119 जनावरांना वेगाने लसीकरण करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात आज अखेर 93% लसीकरण पुर्ण झाले असून साखर कारखान्यांवर दाखल होणाऱ्या जनावरांना दिपावली बसूबारसच्या पार्श्वभूमीवर तपासणी व लसीकरणाची विशेष मोहीम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून बसू बारस पर्यंत 100% लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.