अक्कलकोट : मुस्ती येथील हरणा नदीस आलेल्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. शनिवारी दिवसभर शोध घेतला पण त्यांचा तपास लागला नाही. गेल्या जुलै मध्ये एका युवकाचा येथेच नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. Solapur: Farmer washed away in Musti Harna river, second incident in four months, search underway Akkalkot Musti
शिवानंद शरणप्पा वाले (वय ५६) रा मुस्ती असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शिवानंद वाले हे शुक्रवारी रात्री आपल्या शेतावरून घरी येत होते. शुक्रवारी (ता.14 ) रात्री आठ वाजता हरणा नदी पात्रातून येताना पाण्याचा प्रवास जास्त असल्याने ते वाहून गेले. याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळपासून दिवसभर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. नदीपात्रात जास्त पाणी असल्याने ते मिळून आले नाहीत.
यापूर्वी गेल्या १७ जुलै रोजी शौकत रशीद नदाफ (वय ३८) रा. आनंदनगर (बेघरवस्ती) मुस्ती याचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शौकत हा मुस्ती गावातील एका हॉटेलमध्ये काम करून आपले घर चालवत होता. नेहमीप्रमाणे हॉटेलमधील काम संपवून रात्री तो बेघर वस्तीवरील आपल्या घरी निघाला होता.
हरणा नदीतून जाताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. त्यानंतर अशा दुर्घटना घडू नये म्हणून मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. अनेक वर्षापासून हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी करुनसुध्दा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते. या युवकाच्या मृत्यूनंतर प्रशासन हलले. त्यानंतर मुस्ती-आरळी दरम्यान पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने वरिष्ठाकडे पाठविला आहे.
□ मुस्ती- बेघरवस्तीला जोडणारा पूल बांधा
मुस्ती गावाजवळून हरणा नदी वाहते. नदीच्या पलीकडे आनंदनगर (बेघरवस्ती) हा दोन हजार लोकोस्तीचा भाग आहे. नदीला पाणी आल्यानंतर पलीकडे जाताना ग्रामस्थांना संकटाला तोंड द्यावे लागते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात सखाराम गायकवाड हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
तसेच अनेक जण पाण्यात वाहून गेले मात्र सुदैवाने ते वाचले. तीन-चार महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पूल बांधण्याचा प्रश्न सरकारी दप्तरी अद्यापही रखडलेलाच आहे. येथे लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात सखाराम गायकवाड हे वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अनेकजण पाण्यात वाहून गेले. मात्र सुदैवाने ते वाचले. तीन-चार महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पूल बांधण्याचा प्रश्न सरकारी दप्तरी अद्यापही रखडलेलाच आहे. लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर । परीक्षा देऊन घरी जाताना कॉलेजकुमार युवकावर काळाचा घाला
□ भंडारकवठे येथील अपघातात एक ठार; दोघे जखमी
सोलापूर : परीक्षा देऊन दुचाकीवरून भंडारकवठे येथे आपल्या घराकडे दुचाकीवरुन निघालेल्या युवकाच्या दुचाकीला अपघात होऊन एक युवक ठार झाला असून इतर दोन युवक जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 15) दुपारी तीनच्या दरम्यान मंद्रूप-निंबर्गी या मार्गावर घडली आहे.
आदर्श सिद्धाराम बिराजदार (वय-१७.रा.भंडारकवठे, ता.द. सोलापूर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर या अपघातात त्यांच्यासोबत असलेले कृषीराज महादेव धनुरे (वय-१७, भंडारकवठे) सचिन सोमनिंग चाबुकस्वार (वय-१७, रा. भंडारकवठे ) हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेत वरील तिघे मित्र शिकत होते.
शनिवारी तिघेजण परिक्षा देऊन आपल्या दुचाकीवरून भंडारकवठे येथे आपल्या घरी निघाले. मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्तीजवळ ऊसाने भरुन भंडारकवठेकडे निघालेल्या ट्रँक्टरची ट्रॉली रस्त्यावरून धावताना इकडे-तिकडे गेली. यात पाठीमागून येणारी या युवकांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली आली.
यात आदर्श बिराजदार यांच्या मांडीवरून ट्रॅक्टरची चाक गेल्याने यात तो गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चालविणारा कृषीराज धनुरे आणि सचिन चाबुकस्वार हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर तिघांना सोलापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.