□ नागेश वल्याळचा 13 मतांनी पराभव
सोलापूर : सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या बहुचर्चित निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने बाजी मारली असून पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सत्ताधार्यांविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान दिले होते. मात्र मतदारांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला आहे. Markandeya Cooperative Hospital Elections Dominated by Incumbents Solapur
यामध्ये सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुचन हायस्कूल आवारातील डी. आर. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये या मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए.गावडे यांनी काम पाहिले. त्यांनी सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची घोषणा केली.
परिवर्तन पॅनलचे उमेदवार व माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांचा पराभव झाला. अवघ्या 13 मतांनी त्यांना पराभव झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल मधील मनोहर अन्नलदास वगळता उर्वरित सर्व उमेदवारांना भरघोस अशी मते मिळाली. निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये मनोहर इगे, गणेश पेनगोंडा, अॅड, राजगोपाल विडप, व्यंकटेश दोंता, श्रीनिवास कोंडा (वैयक्तिक मतदारसंघ), नागेश वल्याळ, श्रीहरी इराबत्ती (संस्था मतदारसंघ), नागेश वल्याळ (ओबीसी मतदारसंघ) यांचा पराभव झाला आहे.
रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्यासह कुचन – सादूल- बोमड्याल गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. सत्ताधार्यांविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केले होते, परंतू मतदारांनी सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला.
श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाच्या या निवडणुकीत वैयक्तिक मतदारसंघातून लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, राजेशम येमूल, पार्वतय्या श्रीराम, संस्था मतदारसंघातून अविनाश बोमड्याल, रमेश विडप, इरेशम कोंपेल्ली, मनोहर अन्नलदास, विनायक कोंड्याल तर ओबीसी मतदारसंघातून सुरेश फलमारी हे विजयी झाले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
परिवर्तन पॅनलचे उमेदवार व माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांचा पराभव झाला. अवघ्या 13 मतांनी त्यांना पराभव झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल मधील मनोहर अन्नलदास वगळता उर्वरित सर्व उमेदवारांना भरघोस अशी मते मिळाली.
या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये मनोहर इगे, गणेश पेनगोंडा, अॅड, राजगोपाल विडप, व्यंकटेश दोंता, श्रीनिवास कोंडा (वैयक्तिक मतदारसंघ), नागेश वल्याळ, श्रीहरी इराबत्ती (संस्था मतदारसंघ), नागेश वल्याळ (ओबीसी मतदारसंघ) यांचा पराभव झाला आहे.
● सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना भरता येणार दीड कोटीच्या आतील निविदा
सोलापूर : महाराष्ट्रात ३ लाखापेक्षा अधिक सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता व छोटे कंत्राटदार कामाविना बसून होते. त्यांच्यासाठी शासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे.
आता १.५ कोटीच्या आतील निविदा विना स्वमालकीची जागा, स्वमालकीची मशनरी सामुग्री शिवाय भरता येणार आहे. महासंघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून यासंदर्भात पाठपुरावा चालू होता. त्याला यश मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, स्थापत्य अभियंता व छोटे कंत्राटदार व विकासकांच्या बाबतीत १२ मे २२ रोजी शासनाने एक अन्याय कारक निर्णय घेतला होता. त्याद्वारे फक्त ५० लाखाच्या आतील कामे स्वःमालकीचे प्लॉट, व जागा, तसेच स्वमालकीची मशनरी, सामुग्री, साहित्य त्यांच्याकडे नसले तरी त्यांना निविदा भरण्यासाठी परवानगी दिली होती.
परंतु त्यावरील ५१ लक्ष ते १.५ कोटींचे कोणत्याही सरकारी कामांची निविदा भरताना स्वमालकीची प्लॉट, जागा, स्वमालकीची मशनरी, सामुग्री, साहित्य त्यांच्याकडे असल्याशिवाय त्यांना निविदा भरता येणारच नाही. असा शासन निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सामान्य छोटया कंत्राटदारांना मोठी निविदा भरणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शासनाची सर्व छोटी कामे हे ठराविक मोठे कंत्राटदारच बळकावित होते. या अन्यायाविरूध्द शासन व मंत्री स्तरावर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार व महासंघ व राज्य अभियंता संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास आज यश मिळाले आहे.