Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर । रेल्वे अधिकाऱ्याचे घर कार्यालयातील वायरमनने फोडले

Solapur. Railway officer's house broken by wireman in office gold tola

Surajya Digital by Surajya Digital
October 16, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर । रेल्वे अभियंत्याचे घर फोडून साडेबारा लाखाचा ऐवज लंपास
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ २८ तोळे सोन्याचे दागिने जप्त

 

● सोलापूर : दमाणी नगरातील सोनी सिटी येथील रेल्वे इंजिनियर त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनाला परराज्यात गेल्यावर त्यांच्या नवीन घरात इलेक्ट्रिक वायरचे काम करणाऱ्या वायरमने घरातील २८ तोळे सोन्याचे व दोन तोळे चांदीचे दागिन्यांसह तब्बल साडेबारा लाखांचे साहित्य चोरल्याची माहिती समोर आली आहे. Solapur. Railway officer’s house broken by wireman in office gold tola

पोलिसांनी त्या वायरमनला अटक केली असून मालही ताब्यात घेतला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी भाऊराव अर्जुन वाघमोडे (रा. आदित्य नगर, आरटीओ ऑफिसजवळ) या संशयिताला जेरबंद केले.

सूरज सीताराम तिवारी हे त्यांच्या कुटुंबासोबत तामिळनाडूतील रामेश्वरला गेले होते. १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ते परगावी होते. त्याचवेळी त्यांच्या नवीन घरात कामे सुरू होती. त्यांनी विश्वासाने कामगारांकडे घराची चावी दिली होती. मात्र त्याने कोणी नसल्याची संधी साधत घरफोडी केली.

घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहायक पोलीस निरीक्षक निरगुडे, पोलीस हवालदार दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुंखे यांनी त्याठिकाणी भेट दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

कुलूप न तोडता बेडरूमच्या काचेच्या स्लाईडिंग डोअरमधून चोरटा आत शिरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बनावट चावीचा वापर करूनच चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार त्यांनी तपास सुरु करीत त्याठिकाणी आतापर्यंत भेटी दिलेल्यांवर पोलिसांनी वॉच ठेवला होता.

□ पोलिसांच्या जाळ्यात अडकला भाऊराव

भाऊराव वाघमोडे हा चार ते पाच दिवसापूर्वी चोरलेल्या वस्तूंपैकी टॅब विकायला हा सिध्देश्वर मंदिराजवळ येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक निरगुडे यांच्या पथकाने सापळा लावून त्याला जेरबंद केले व बनावट चावीचा वापर करून आपणच स्वतः चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.

 

● आई सोबत भांडण करून आत्महत्या 

सोलापूर – दारूच्या नशेत आईसोबत भांडण केल्यानंतर एका ३४ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुमठा नाका परिसरातील संजय नगरात आज रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
 विपुल मधुकर बनसोडे (वय ३४ रा.संजय नगर) असे मयताचे नाव आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत आईसोबत भांडण केले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने घरातील छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून विशाल (भाऊ) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.
Tags: #Solapur #Railway #officer's #housebroken #wireman #office #gold #tola#सोलापूर #रेल्वे #अधिकारी #घर #कार्यालय #वायरमन #फोडले #सोने #तोळे
Previous Post

हरणा नदीत वाहून गेलेल्या शेतक-याचा मृतदेह ४० तासाने सापडला

Next Post

मार्कंडेय सहकारी रूग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मार्कंडेय सहकारी रूग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व

मार्कंडेय सहकारी रूग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697