Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

Solapur. As soon as the case is registered at CCH, a new app has come again to solve the crime

Surajya Digital by Surajya Digital
October 19, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा
0
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

• बुडालेला पैसा काढण्यासाठी नवा जुगाड, नवा जुगार

सोलापूर : झटपट श्रीमंत होण्यासाठी हजारो रुपये गुंतवल्यानंतर लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून शेकडो सोलापूरकरांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सीसीएच ॲपवर गुन्हा दाखल झाला. त्याचा अद्याप तपास सुरू झालेला नसतानाच सोलापूरकरांना लुबाडण्यासाठी नवा ॲप पुन्हा बाजारात अवतरला आहे. Solapur. As soon as the case is registered at CCH, a new app has come again to solve the crime

 

विशेष म्हणजे सीसीएच ॲपमधून ज्यांनी लाखो रुपये कमवले त्यांनी आणखी कमवण्यासाठी आणि ज्यांनी लाखो रुपये गमावले; त्यांनी ते मिळवण्यासाठी या नव्या ॲपमध्ये गुंतवणूक सुरू केली आहे. बुडालेला पैसा काढण्यासाठी सुरू केलेला हा नवा जुगाड किती दिवस टिकणार आणि हा नवा जुगार किती दिवस चालणार? हे मात्र निश्चित नसल्यामुळे सोलापूरकर पुन्हा नव्या फसवणुकीत अडकतात की काय ? असा संशय निर्माण झाला आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून हजारो गुंतवल्यानंतर लाखो रुपये मिळवून देणाऱ्या सीसीएच ॲपचा धूमधडाका सोलापूर शहरात सुरू होता. गेल्या आठवड्यातच या ॲपने करोडोंचा चुना लावून रातोरात गाशा गुंडाळून पोबारा केल्यानंतर घाबराघुबरा झालेला सोलापूरकर नागरिक फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवताना दिसला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे. गुन्हे शाखेने अद्याप या तपासाला हात घातलेला नाही. सोलापुरात सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे.

लाखो रुपये कमवून देणाऱ्या नव्या ॲपची चर्चा शहरात सुरू झाली आहे. त्याचवेळी हा ॲप किती दिवस टिकणार आणि किती दिवस गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळणार? हे निश्चित नसल्यामुळे दुसऱ्या बाजूला गंडवले जाण्याची भीतीसुध्दा निर्माण झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

■ सुरुवातीला पैसे मिळतात हा समज

सीसीएच ॲपचा धुमाकूळ साधारण सहा महिन्यांपासून सुरू होता. म्हणजेच सहा सीसीएचमधून परतावा मिळत होता. त्यावर अनेकजण श्रीमंत झाले. त्यानंतर सीसीएच शटडाऊन झाले. आता नव्याने आलेल्या अॅपमधूनही सुरुवातीला पैसे मिळतील. सुरुवातीलाच फसवणूक होणार नाही; म्हणून नव्या ॲपमध्ये सोलापूरकर डोळे झाकून गुंतवणूक करताना दिसत आहेत..

■ तीच फाईल, तशीच स्टाईल

 

सीसीएच अॅप गुगल प्लेस्टोरवरून इन्स्टॉल केल्यानंतर रुपयांमधील गुंतवणुकीला डॉलरमध्ये परतावा मिळत होता. अगदी सीसीएच अॅपची जी स्टाईल होती; त्याच स्टाईलचे नवे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध झाले असून त्याचीच सध्या सोलापूरमध्ये चलती आहे. सीसीएचचा गंडा माहीत असतानाही या नव्या अॅपमध्ये गुंतवणुकीचा फंडा जोरात सुरू झाला आहे.

 

■ कशासाठी.. ? जिथे हरवले… तिथेच शोधण्यासाठी…

कोणी कर्ज काढून, कोणी घरातले दागदागिने विकून, कोणी जागा- घर गहाण ठेवून पैसा उभा केला आणि सीसीएचमध्ये गुंतवला. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी गुंतवणूक केली; विशेषत: त्यांचीच फसवणूक झाली. त्यांनी जे सीसीएचमध्ये हरवले आहे; ते शोधण्यासाठी तेच लोक या नव्या ॲपमध्ये उतरले आहेत. जिथे हरवले; तिथेच शोधायचे ही या लोकांची मानसिकता आहे.

□ घोटाळा होण्यापूर्वीच ठोकावा टाळा 

 

येणाऱ्या काळामध्ये सीसीएचप्रमाणे मोठा घोटाळा होऊ शकतो. त्या आधीच लोकांनी सतर्क झाले पाहिजे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपल्या कष्टाचा पैसा घातला नाही पाहिजे. सायबर विभागाने व पोलीस प्रशासनाने याचा तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतला पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा अशा प्रकारचा गुन्हा घडूच नये यासाठी पोलीस यंत्रणेने पावले उचलली पाहिजेत.

– राज सलगर (सामाजिक कार्यकर्ते)

 

Tags: #Solapur #case #registered #CCH #newapp #comeagain #solve #crime #cybercrime#सोलापूर #सीसीएच #दाखल #गुन्हा #गंडवणे #नवाॲप
Previous Post

मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र

Next Post

मोठा विजय : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेस अध्यक्ष

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मोठा विजय : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेस अध्यक्ष

मोठा विजय : मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेस अध्यक्ष

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697