Wednesday, March 22, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र

Fadnavis Pawar Shelar: Political opponents will come together for the chicken that lays the golden egg, Mumbai Cricket Association

Surajya Digital by Surajya Digital
October 19, 2022
in Hot News, खेळ, राजकारण
0
मुंबई क्रिकेट असोसिएशन : सोन्याचे अंडी देणा-या कोंबडीसाठी राजकारणातील विरोधक येणार एकत्र
0
SHARES
73
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार येणार एकत्र एका मंचावर

 

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थातच एमसीए निवडणूक होणार आहे. एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात आहेत. Fadnavis Pawar Shelar: Political opponents will come together for the chicken that lays the golden egg, Mumbai Cricket Association

 

राजकारणात कधी काय होईल, हे कोणालाच सांगता येणार नाही. राजकारणात विरोधक असणारे एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएन निवडणुकीनिमित्त ते एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आयपीएल क्रिकेट सामने आणि देशातंर्गत क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून ‘एमसीए’ची आर्थिक भरभराट होते. त्यामुळेच सोन्याचं अंड देणाऱ्या या कोंबडीवर राज्य करण्यासाठी राजकारणी जिवाचं रान करत असल्याचे आता दिसत आहे.

बीसीसीआय आयपीएलमधून काही हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळविते. त्यातील निम्मा वाटा हा संघ मालकांना, तर काही वाटा हा सदस्य असलेल्या राज्य संघटनांना दिला जातो. संपलेल्या आर्थिक वर्षापर्यंत बीसीसीआयकडून मुंबई संघटनेला दरवर्षी पंचवीस ते तीस कोटी रुपये हे आयपीएलच्या नफ्यातून मिळाल्याची माहिती आहे.

शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार रोज क्लबच्या मेंबरसाठी स्नेहभोजन ठेवत आहेत. कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुणालाच आपल्या हातून गमावयची नाहीय. त्यामुळे ‘एमसीए’वर आपला ताबा राहावा यासाठी सर्व राजकारणी मंडळींनी आता चांगलीच कंबर कसली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शिवाय प्रत्येक मॅच संयोजनापोटी, मॅचच्या दरम्यान स्टेडियममध्ये लावल्या जाणाऱ्या जाहिरातींतून तसेच तिकिट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाचा वाटाही संबंधित संघटनांना दिला जातो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत मुंबई क्रिकेट असोसिएशन संघटनेला शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी बीसीसीआयकडून मिळाला आहे. आणि आगामी वर्षात ही रक्कम ५०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

राजकारणात विरोधात पण क्रिकेटच्या मैदानात एकमेकांच्या हातात हात घातल्याचे चित्र दिसणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकत्र येणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे पुढारी आज या निवडणुकीनिमित्त एकत्र येणार आहे. खासकरुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

 

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे तिघंही स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत. एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट ग्रुपकडून अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले माजी क्रिकेटर संदीप पाटलांसमोर पवार-शेलार महाआघाडीचे आव्हान असेल.

बक्कळ पैसा कमावण्यासाठीच निवडणुकांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणारे राजकारणी ‘एमसीए’च्या निवडणुकीत एकत्र आलेत. शरद पवार आणि आशिष शेलार यांचं संयुक्त पँनेल झालं आहे. पवार-शेलार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांच्या नेत्यांचा समावेश दिसून येतो. यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे यांच्यासह शरद पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विहंग सरनाईक यांचा यात समावेश आहे.

 

Tags: #Fadnavis #Pawar #Shelar #Political #opponents #cometogether #chicken #lays #goldenegg #Mumbai #Cricket #Association#मुंबई #क्रिकेट #असोसिएशन #मुंबईक्रिकेटअसोसिएशन#सोन्याचे #अंडीदेणा-याकोंबडी #राजकारण #विरोधक #एकत्र #देवेंद्रफडणवीस #आशिषशेलार #शरदपवार
Previous Post

बैठकीत घमासान : रेल्वे बाबूंच्या मनमानीला कंटाळून खासदाराने दिला राजीनामा

Next Post

Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

Cyber crime सोलापूर । सीसीएचवर दाखल होताच गुन्हा, गंडवण्यासाठी नवा ॲप आला पुन्हा

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697