नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष होणार आहेत. खरगे यांचा आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत निकालाची घोषणा केली जाणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. Big win: Mallikarjun Kharge to become Congress President AC Movement Leader
मल्लिकार्जुन खर्गे यांना 7000 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर शशी थरुर यांना 1000 पेक्षा जास्त मते मिळाली. थरुर यांनी आपला पराभव स्वीकार केला आहे. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होती. त्यापैकी मल्लिकार्जुन खर्गे यांना शशी थरूर यांचा पराभव करण्यात यश आले.
मल्लिकार्जुन खर्गे यांना 7,897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. 17 ऑक्टोबर 2022 रोजी विविध राज्यांमध्ये स्थापन केलेल्या मतदान केंद्रांवर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान झाले. मतदान प्रक्रियेत 9500 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला. काँग्रेसच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी 96 टक्के मतदान झाल्याचा दावा केला होता.
काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. अध्यक्षपद निवडणुकीसाठी जवळपास 96 टक्के मतदान झालं होतं. 24 अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली होती.
काँग्रेस पक्षनेते 2019 पासून ज्याची वाट पाहात होते, ते अध्यक्ष आज पक्षाला मिळाले आहेत. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचे असल्याचे वेळोवेळी दिसून आलं आहे.
अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं यासर्व गोष्टींमुळे ‘नॉन-गांधी’ हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ एसी आणि मूव्हमेंट लिडरमधून मूव्हमेंट लिडरचा विजय
मूव्हमेंट लिडर… :
८० वर्षीय खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. बिदर ही त्यांची जन्मभूमी तर आपल्या शेजारी असलेल्या गुलबर्गा ही त्यांची कर्मभूमी. तब्बल ९ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी हुकूमत गाजवली तसेच कर्नाटकात गृहमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. खरगे यांची जडणघडण चळवळीतून झाली.
विद्यार्थी संघटना ते संसदपटू अशी त्यांची राजकीय कारकीर्द विलक्षण आहे. विशेष म्हणजे गांधी घराण्याचा एकनिष्ठ नेता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. देशातील नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी आस्था आहे. म्हणून मूव्हमेंट लिडर म्हणून खरगेंची खासियत आहे. काँग्रेसला चळवळींचा नेता हवा आहे, असे काँग्रेस नेते म्हणत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी मतदान झाल्यानंतर जो जनमत कौल आला, तो खरगेंच्या पारड्यात होता.
■ एसी लिडर… :
६६ वर्षीय थरूर हेही काँग्रेसचे एकनिष्ठ नेते. केरळमधील तिरूवनंतपुरचे ते खासदार भारतात आल्यानंतर त्यांचा ठिय्या राजधानी दिल्लीतच असतो. जास्त करून त्यांना लंडनची हवा मानवत असते. हस्तीदंत आणि ‘एसीरूम’मधला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. चळवळीशी काहीही संबंध आलेला नाही.
चिकना आणि गोरापान चेहरा हे त्यांचे व्यक्तीमत्व. गांधी घराण्यापासून चार हात लांबच. सुनंदा पुष्कर प्रकरणात त्यांचे नाव गाजले. देशात त्यांची फारशी ओळख नाही. पण दिल्लीत वजन आहे. इंग्रजीवर विशेष प्रभुत्व. २००२. ते २००७ मध्ये युनोच्या उपसरचिटणीसपदी त्यांची निवड झाली होती. अध्यक्षपदासाठी एसी लिडर चालणार नाही, असे काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत पण ते निवडून आले नाहीत, त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.