मुंबई : राज्यातील आरोग्य विभागात जवळपास 10 हजार जागांची भरती होणार आहे. पुढल्या वर्षी 1 ते 7 जानेवारीपर्यंत यासंबंधी जाहिरात काढली जाणार आहे. गिरीश महाजन यांनी याची माहिती दिली आहे. Get ready – Recruitment of 10 thousand posts in health department Medical Education Minister Girish Mahajan
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा ग्रामीण विकास आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ आणि २६ मार्चला भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघालेली होती. त्यावेळी साडेअकरा लाख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही.
परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती. सुमारे साडेअकरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांनी परीक्षा शुल्कही भरले होते. परंतु विविध कारणांनी परीक्षा झाली नाही. मात्र सत्तेतले नवे सरकार युवकांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसार पुढच्या २ महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.
कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.
• पदभरतीच्या एकूण जागा – 10,127
– परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
– निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023
□ राज्यात 18 हजार पोलिसांची भरती, आठवड्याभरात जाहिरात काढणार
राज्यामध्ये 18 हजार पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. आम्ही ठरवलंय की येत्या वर्षभरात महाराष्ट्रात 75 हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही 18 हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही येत्या आठवड्याभरात काढतो आहोत, असे फडणवीस म्हणाले आहेत. नुकतीच गिरिष महाजनांनी सुद्धा आरोग्य खात्यात भरतीची घोषणा केली आहे.