सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आज शनिवारी (ता. 22) सायंकाळी मावळत्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून पदभार स्वीकारला. ते उद्या सकाळी 11.30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. New Superintendent of Police Shirish Sardeshpande took charge of Solapur
तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापुरात केलेली कामगिरी कायम स्मरणात राहणारी आहे. त्यांचे ऑपरेशन परिवर्तन हा प्रयोग ब-यापैकी यशस्वी झाला होता. अनेक नेते, मंत्र्यांनी भेटी देऊन या प्रयोगाचे कौतुक केले होते. अवैध व्यवसायापासून परावृत्त करून त्या गुन्हेगारी व्यक्तीस चांगला व्यवसाय करण्यास मदत करणे या या परिवर्तन ऑपरेशनचा अर्थ होता.
राज्याच्या गृह विभागाने राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांना अद्यापही पदस्थापना मिळालेली नाही. त्याबाबतचा आदेश लवकरच निघणार असल्याची माहिती आहे.
● शिरीष सरदेशपांडे यांच्याविषयी
नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे पोलिस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे मानकरी आहेत. २२ वर्षांपूर्वी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव येथे पोलिस उपअधीक्षक आणि त्यानंतर लातूरचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून, नांदेड, पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली. मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी, नाशिकचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》महिलेला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून पैशांची मागणी
□ लोनॲपमधून कर्ज देऊन घेतलेल्या फोटोचा केला दुरूपयोग
सोलापूर : रोज अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटना समोर येत आहेत. आता महिलांनादेखील लोन ॲपच्या ट्रॅपमध्ये अडकवून पैशांची मागणी होत असल्याची घटना समोर आल्याची माहिती पंढरपूर विभागाचे निर्भया पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली.
पंढरपुरातील एका महिलेला सोशल मीडियावर कर्ज हवे आहे का, असा मेसेज आला. पैशाची गरज असल्याने तिने त्या मेसेजला उत्तर दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने संबंधित महिलेची कागदपत्रे मागवून घेतली. यामध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांचा समावेश होता. त्या महिलेस चार हजारांचे कर्जही दिले.
परंतु समोरच्या व्यक्तीने संबंधित महिलेच्या कागदपत्रावरील तिच्या चेहऱ्याचा फोटो वापरून संगणकाद्वारे निर्वस्त्र फोटो तयार केले. ते फोटो त्या महिलेला पाठवले. तुमचे हे निर्वस्त्र फोटो सोशल मीडियावर व तुमच्या नातेवाइकांनाही पाठवू, अशी धमकी देऊन महिलेकडे पैशाची मागणी केली. परंतु महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून निर्भया पथकाकडे तक्रार दिली.