Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अनंत करमुसे प्रकरणात माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

Supreme Court issues notice to former minister Jitendra Awha in Anant Karamuse case

Surajya Digital by Surajya Digital
October 22, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
अनंत करमुसे प्रकरणात माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना नोटीस बजावली आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने करमुसे यांची याचिका स्विकारत जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. आव्हाडांना याआधी ठाणे न्यायालयाने जामीन दिला आहे.

यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनंतराव करमुसे यांची याचिका स्वीकारली असून या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. ठाणे शहर पोलीस आव्हाड यांच्याशी हातमिळवणी करत असल्याचा यात आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अशी मागणी याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

 

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याआधी हीच मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

● नेमके प्रकरण, कशामुळे मारहाण

 

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले होते. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती.

 

याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती.पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

 

Tags: #SupremeCourt #issuesnotice #formerminister #JitendraAwhad #AnantKaramuse #case#अनंतकरमुसे #प्रकरण #माजीमंत्री #जितेंद्रआव्हाड #सुप्रीमकोर्ट #बजावली #नोटीस
Previous Post

दीपोत्सवाचे ‘राज’ कारण, ईडी सरकारने केले अनावरण

Next Post

सोलापूर । नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला पदभार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर । नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला पदभार

सोलापूर । नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला पदभार

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697