सोलापूर : सोलापूर बार असोसिएशन अध्यक्षांची मुदत १० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार आता बार असोसिएशनच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला आहे. त्यानुसार निवडणूक ११ नाव्हेंबर रोजी होणार असून ३ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला प्रारंभ होणार आहे. Solapur Bar Association election next month, program announced
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ निलेश ठोकडे यांचा कार्यकाल २७ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबर रोजी बार असोसिएशनसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय ठरला आहे. १८ ऑक्टोबरपासून सदस्य वकिलांकडून वर्गणी गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
न्यायालयातील वकिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचे काम बार असोसिएशन तर्फे करण्यात येते. यापूर्वी रजाक शेख, व्ही. एस. आळंद, मिलिंद थोबडे, एस. एन. मारडकर, संतोष न्हावकर, बसवराज सलगर यांच्यासह अनेक अध्यक्षांनी नवीन वकिलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे असे बार असोसिएशनकडून सांगण्यात आले.
मागील निवडणुकीत ॲड. निलेश ठोकडे यांनी विरोधातील ॲड. सुरेश गायकवाड यांच्या पॅनलचा पराभव करून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.
सोलापूर बार असोसिएशनअंतर्गत मागील निवडणुकीत एक हजार ३३३ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता निवडणुकीपूर्वी संबंधित सदस्य वकिलांकडून वर्गणी भरून घेतली जात आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार ॲड. सुरेश गायकवाड यांनी जवळपास दोनशे जणांची वर्गणी स्वत: भरल्याची चर्चा आहे.
शुक्रवारी वर्गणी भरण्याची शेवटची मुदत होती. जवळपास 1300 वकिलांनी वर्गणी भरली आहे. जिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांना स्वत:च्या हक्काचे चेंबर असावेत ही अनेक वर्षांपासून मागणी आहे. न्यायालयात पार्किंगची पुरेशी सोय नाही. याच मुद्द्यांवर आता ही निवडणूक पुन्हा लढविली जाईल, असे बोलले जात आहे. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहानंतर मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी नवीन पदाधिकारी पदग्रहण करतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
● निवडणुकीचा असा कार्यक्रम
– प्रारुप मतदार यादी प्रसिध्द : ३१ ऑक्टोबर
– अंतिम यादी प्रसिध्द : २ नोव्हेंबर
– अर्ज भरण्यास प्रारंभ : ३ ते ४ नोव्हेंबर
– अर्जावर हरकती : ५ नोव्हेंबर
– उमेदवारी माघार : ८ नोव्हेंबर
– मतदान व मतमोजणी : ११ नोव्हेंबर
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतला पदभार
सोलापूर : सोलापूर ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आज शनिवारी (ता. 22) सायंकाळी मावळत्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून पदभार स्वीकारला. ते उद्या रविवारी सकाळी 11.30 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
तेजस्वी सातपुते यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापुरात केलेली कामगिरी कायम स्मरणात राहणारी आहे. त्यांचे ऑपरेशन परिवर्तन हा प्रयोग ब-यापैकी यशस्वी झाला होता. अनेक नेते, मंत्र्यांनी भेटी देऊन या प्रयोगाचे कौतुक केले होते. अवैध व्यवसायापासून परावृत्त करून त्या गुन्हेगारी व्यक्तीस चांगला व्यवसाय करण्यास मदत करणे या या परिवर्तन ऑपरेशनचा अर्थ होता.
राज्याच्या गृह विभागाने राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या काल बदल्या केल्या. त्यामध्ये सोलापूर पोलीस अधीक्षकपदी शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पोलीस अकादमी नाशिकचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांना अद्यापही पदस्थापना मिळालेली नाही. त्याबाबतचा आदेश लवकरच निघणार असल्याची माहिती आहे.
● शिरीष सरदेशपांडे यांच्याविषयी
नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे पोलिस महासंचालकांच्या सन्मानचिन्हाचे मानकरी आहेत. २२ वर्षांपूर्वी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत.
चंद्रपूर, भुसावळ, चाळीसगाव येथे पोलिस उपअधीक्षक आणि त्यानंतर लातूरचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून, नांदेड, पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणूनही चांगली कामगिरी केली. मुंबईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त, पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी, नाशिकचे उपसंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आता त्यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. त्यानुसार त्यांनी आज पदभार स्वीकारला.