उस्मानाबाद : ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद (धाराशिव) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाने बंदची हाक दिली. याबाबतची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हेही उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज हा बंद पुकारण्यात आला. The Osmanabad bandh called by the Thackeray group turned violent
शिवसेनेच्या या हाकेला व्यापार्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट हाेता. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळणे, एसटी बसेसवर दगडफेक झाल्याची माहिती आहे.
शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा कचेरीसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. बजाज अलाईन्स जनरल इन्शूरन्स कंपनीने तात्काळ शेतकऱ्याचे विम्याचे पैसे द्यावेत अन्यथा यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिक देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समर्थनात आज उस्मानाबाद बंदचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.
शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात आले. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावले. सहा दिवस झाले तरी सरकार प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आंदोलन तीव्र करण्यात आलय, काल दिवसभर शिवसैनिकांनी रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून बसने, जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावणे, जलबैठे आंदोलन,असे अनेक आंदोलन केली तरी योग्य तो प्रतिसाद शासनाकडून मिळत नसल्याने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले होते.
□ पुण्यात इंस्टाग्रामवर पिस्तूल विकणाऱ्यांना अटक
इंस्टाग्रामवर स्टोरी ठेऊन पिस्तूल विकणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड पोलसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशहुन त्यांनी पिस्तूल व काडतुसे आणली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूल व बारा काडतुसे जप्त केली आहेत. खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनास्थळावरून अन्य तीन पिस्तूल घेऊन फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.