- ● 100 हून अधिक लोक पाण्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ हा पूल बंद होता.
गांधीनगर : गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटला असून त्यामुळे सुमारे 400 लोक नदीत पडले आहेत. अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर 5 दिवसांपूर्वी पूल पुन्हा खुला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. Gujarat. 400 people fall into river after cable bridge over river breaks, many more likely to be swept away Morbi Machu River
नदीवरील केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. हा झुलता पूल नूतनीकरणानंतर नुकताच खुला करण्यात आला होता. सुटीच्या काळात झुलता पुलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू होती.
अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 ते 500 लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. हा पूल खूप जुना असून काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. 5 दिवसांपूर्वी ते सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.
100 हून अधिक लोक पाण्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ हा पूल बंद होता. बचाव पथकाने अनेकांना नदीतून वाचवले असून त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने इथे खूप गर्दी होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 एकाच वेळी 36 उपग्रह सोडले…; पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केले कौतुक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात छठ सणाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ” भारताने एकाच वेळी 36 उपग्रह सोडले आहेत. पूर्वी भारतातील अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणेच्या कक्षेत मर्यादित होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र भारतातील तरुणांसाठी, भारताच्या खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले, तेव्हा त्यात क्रांतिकारी बदल होऊ लागले आहेत, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
समस्त भारतीय दिवाळी सणाच्या तयारीत मग्न असताना आणि फटाक्यांच्या आतषबाजीने, दिव्यांच्या रोषणाईने तेजाळून निघण्यास आसमंत आसुसलेला असतानाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने अंतराळात एक नवा इतिहास रचला. ब्रिटनच्या कम्युनिकेशन नेटवर्क ‘वन वेब’चे तब्बल 36 उपग्रह इस्रोने आपल्या जीएसएलव्ही-एमके-3 या सर्वांत वजनदार रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित केले.
हे उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले आहेत. लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वांत खालची कक्षा. पृथ्वीपासून 1600 ते 2000 किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे. या कक्षेमध्ये वस्तूचा वेग सुमारे 27 हजार किलोमीटर प्रतितास इतका असतो. त्यामुळे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रह स्थापित करणे अत्यंत आव्हानात्मक असते. त्यामुळेच आज पंतप्रधान मोदी यांनी याचा उल्लेख केला.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले भारतीय परंपरेत छटपूजेला म्हणजेच सूर्यपुजेला फार महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सार्वजनिक छटपूजेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. ठिकठिकाणी राज्याराज्यांमध्ये सार्वजनिक छटपूजा करून सूर्य उपासनेचे वेगवेगळे आयाम आपल्याला दिसून येतात. इतकेच नाही तर प्रदेशांमधून देखील मोठ्या प्रमाणावर छटपूजा केली जात असल्याचे दिसते. आता आपण याला नवीन आयाम जोडला पाहिजे आणि तो आयाम सौर ऊर्जेचा असला पाहिजे.
सौरऊर्जा आपल्या भारतीयांच्या जीवनातला जीवनशैलीचा भाग आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि स्वस्त मिळवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात मधल्या मोढेरासारखे संपूर्ण गावच सौरऊर्जेने व्याप्त आहे. मोढेरा गावाने सौर ऊर्जेच्या वापर वाढवून उर्जा स्वयंपूर्णता मिळवली आहे. अशा अनेक गावांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सौर ऊर्जेने व्याप्त होण्याच्या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकार त्यांचा नक्की सकारात्मक विचार करेल. सौरऊर्जेसंबंधी जितकी जनजागृती होईल तितकी स्वच्छ ऊर्जा स्वस्त ऊर्जा या दृष्टीने आपल्याला पावले उचलता येतील आणि अंतिमतः देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली आहे.
□ मन की बात मध्ये मोदी म्हणाले….
• इस्रोने नवीनतम प्रक्षेपणांसह भारताला जागतिक व्यावसायिक – बाजारपेठेत एक मजबूत खेळाडू बनवले आहे.
– संपूर्ण जग सौरऊर्जेकडे आपले भविष्य पाहत आहे. आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी किसान कुसुम योजना सुरू केली. ज्या अंतर्गत शेतकरी सौर पंप बसवत आहेत.
– गुजरातमधील मोढेरा गावाचा मोदींनी उल्लेख केला. या गावातील जवळपास सर्व घरे त्यांच्या विजेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करत आहेत.